चिंचवड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमधील विद्यानगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २८ जून २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान देवता प्रोव्हिजन स्टोअर्सजवळ, आयशा मशिदीच्या पाठीमागे, विद्यानगर, चिंचवड येथील राहत्या घरी घडली.
महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील नागनाथ दत्तू कांबळे (वय ४५, व्यवसाय – चालक) यांनी पत्नी वैशाली नागनाथ कांबळे (वय ३५) हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत तिचा गळा दाबून खून केला. या तक्रारीवरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पिंपरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
