Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू
पिंपरी चिंचवड

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रत्यक्ष कामकाजाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पुढाकार; ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वर्दळीच्या भागांची पाहणी

शहराच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक :- अभिषेक बारणे

पिंपरी चिंचवड: शहराच्या वाढत्या नागरीकरणासोबतच वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करणे यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विशेष भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ‘पार्किंग पॉलिसी’ आणि ‘हॉकर्स धोरण’ प्रभावीपणे राबविण्याच्या हालचालींना प्रत्यक्ष गती मिळाली असून, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध भागांचे प्रत्यक्ष पाहणी दौरे सुरू करण्यात आले आहेत.

शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहनसंख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी मात करणे, नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित व मोकळे पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे तसेच फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोनची निश्चिती करून त्यांचे योग्य पुनर्वसन करणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाकांक्षी धोरणाची अंमलबजावणी कागदावरच न राहता प्रत्यक्षात जमीन स्तरावर कशी राबविता येईल, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.

या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या काळेवाडी फाटा चौक, बी.आर.टी. मार्ग तसेच थेरगाव परिसरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भविष्यात वाहनचालक, व्यावसायिक आणि पादचाऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने योग्य जागांची निश्चिती करण्याबाबत व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या पाहणी व आढावा दौऱ्यावेळी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त मुकेश कोळप, स्वीकृत नगरसेवक संदीपभाऊ गाडे तसेच महापालिकेचे संबंधित विभागप्रमुख व अधिकारी वर्ग उपस्थित होता. शहराचे नियोजनबद्ध, सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध रस्ते हेच शहर विकासाचे खरे प्रतीक असते, असे मत अभिषेक बारणे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या लोकहिताच्या मोहिमेला पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे पूर्ण सहकार्य लाभेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“पिंपरी-चिंचवड शहराचा सुनियोजित विकास करणे आणि नागरिकांना वाहतुकीची कोणतीही अडचण भासू नये, यासाठी ‘पार्किंग पॉलिसी’ आणि ‘हॉकर्स धोरण’ अत्यंत गांभीर्याने आणि प्रभावीपणे राबवले जात आहे. या धोरणांमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईलच, सोबतच पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते आणि फेरीवाल्यांना हक्काचे व योग्य पुनर्वसन मिळेल. ही केवळ प्रशासकीय मोहीम नसून शहराला शिस्त लावणारा महत्त्वाचा निर्णय आहे. यासाठी सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करतो.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी विद्यार्थ्यांची ओळख; समर्थ पॉलीटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्रामला उत्स्फूर्त सुरुवात
Next Article विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?