Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी विद्यार्थ्यांची ओळख; समर्थ पॉलीटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्रामला उत्स्फूर्त सुरुवात
पुणे

तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी विद्यार्थ्यांची ओळख; समर्थ पॉलीटेक्निकमध्ये इंडक्शन प्रोग्रामला उत्स्फूर्त सुरुवात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे,बेल्हे प्रतिनिधी संदीप शितोळे : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे येथे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. अनिल कपिले होते. यावेळी त्यांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पॉलिटेक्निक शिक्षणाचे महत्त्व, तांत्रिक शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या विविध करिअरच्या संधी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले.

“पॉलिटेक्निकचे शिक्षण हे केवळ पदविका मिळविण्यापुरते मर्यादित नसून, उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून कौशल्यपूर्ण करिअर घडविण्याची उत्तम संधी आहे,” असे डॉ. कपिले यांनी सांगितले.

प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणे, तांत्रिक शिक्षणाची दिशा समजावून सांगणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील आवश्यक कौशल्यांची ओळख करून देणे हा इंडक्शन प्रोग्रामचा प्रमुख उद्देश आहे.

चार दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक व उपयुक्त विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास विषयावर श्री. ज्ञानेश्वर धोमरे, ड्रोन तंत्रज्ञान विषयावर श्री. नितीन सोनावणे, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर श्री. प्रथमेष थोरात, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग व 3D प्रिंटिंग विषयावर श्री. सचिन शेलके, तर रोबोटिक्स विषयावर डॉ. रमेश पवार मार्गदर्शन करणार आहेत.

या विविध सत्रांमधून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासोबतच ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, थ्री-डी प्रिंटिंग, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्राथमिक व व्यावहारिक ओळख करून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. संजय कंधारे, इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक प्रा. शाम फुलपगारे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ईश्वर कोरडे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. शाम फुलपगारे यांनी मानले.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची दिशा विद्यार्थ्यांना मिळावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक व प्रेरणादायी सुरुवात व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा इंडक्शन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व उपयुक्त ठरणार आहे

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपारधी समाजातील युवकांनी पुढे येऊन नवीन पिढी घडवावी : धर्मपाल तंतरपाळे
Next Article ‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?