Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती
पिंपरी चिंचवड

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चार बिन कचरा विलगीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून व्यापक जनजागृती

पिंपरी दि. १० ऑगस्ट २०२६ : स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर कचरा विलगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात गृहभेटी देऊन नागरिकांना चार-बिन कचरा विलगीकरणाबाबत माहिती देण्यात येत आहे.

घरातून निर्माण होणारा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा स्वतंत्रपणे ठेवून संबंधित घंटागाडीमध्ये देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. कचरा उघड्यावर टाकणे टाळावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करू नये, याबाबतही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

“कचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण प्रक्रियेत कचऱ्याचे विलगीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. घरातूनच कचरा स्वतंत्र केल्यास त्याची पुढील प्रक्रिया अधिक सुलभ आणि शास्त्रीय पद्धतीने करता येते. त्यामुळे नागरिकांनी चार-बिन पद्धतीचा अवलंब करून महापालिकेस सहकार्य करावे,”

……..आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी.पिंपरी चिंचवड मनपा.

“कचरा विलगीकरणाची सवय प्रत्येक कुटुंबात रुजणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून जनजागृती करण्यात येत आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण झाल्यास त्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे करता येईल,” 

…….अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम.पिंपरी चिंचवड मनपा

“गृहभेटीच्या माध्यमातून नागरिकांना चार प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन आणि घंटागाडीमध्ये कचरा देण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात येत आहे. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी कचरा विलगीकरणाला प्राधान्य द्यावे,”

……उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल.पिंपरी चिंचवड मनपा

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही मोहीम राबविण्यात येत असून, कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू
Next Article RTO प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?