Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला
पिंपरी चिंचवड

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापालिका प्रशासनाने जागे व्हावे! रस्ते आणि सार्वजनिक सुविधांची आरक्षणे ताब्यात घ्या

पिंपरी-चिंचवड : रहाटणी-काळेवाडी परिसरातील रखडलेल्या रस्ते विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यांसाठी आरक्षित असलेल्या काही जागांचा मोबदला घेऊनही संबंधितांनी प्रत्यक्ष जागा महापालिकेच्या ताब्यात दिलेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्ते अडवले गेले आहेत. तसेच नागरिकांच्या सार्वजनिक सोयीसुविधांसाठी आरक्षित केलेल्या जागाही अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. परिणामी, परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, लांबचा वळसा आणि अपुऱ्या नागरी सुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रस्त्यांची तसेच सार्वजनिक हिताच्या आरक्षणांची जागा तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

रहाटणी-काळेवाडी परिसरातील काही ठिकाणी रस्त्यांच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण अथवा अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काळेवाडीतून पिंपरीकडे जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनावश्यक वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आरक्षित रस्त्यांच्या जागा ताब्यात घेऊन त्यांचे प्रत्यक्ष रस्त्यांमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे.

तापकीर मळा ते पिंपरीगाव पूल, लक्की बेकरी ते पिंपरीगाव तसेच राजवाडेनगर ते पिंपरी पूल या मार्गांवरील रस्त्यांचा रखडलेला भाग विकसित केल्यास पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना एम्पायर इस्टेट पुलाकडे जाण्यासाठी अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे या मार्गांचे काम प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे.

याशिवाय रहाटणी-काळेवाडी परिसरातील १२ मीटर, ९ मीटर आणि ६ मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्यांची आरक्षित जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. या प्रक्रियेत ज्या नागरिकांच्या मालमत्ता बाधित होतील, त्यांना नियमानुसार योग्य मोबदला देण्यात यावा. संबंधित जमिनींचे मूल्यांकन करताना प्रचलित बाजारभावाचा विचार करून बाधितांना न्याय्य भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वाकड, रावेत, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या परिसरांमध्ये ज्या पद्धतीने रस्त्यांचे जाळे विकसित झाले आहे, त्याच धर्तीवर रहाटणी-काळेवाडी परिसराचाही नियोजनबद्ध विकास करणे शक्य आहे. त्यासाठी सर्वप्रथम रस्त्यांची आरक्षणे ताब्यात घेऊन रुंद आणि दर्जेदार रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. चांगले रस्ते निर्माण झाल्यास वाहतूक व्यवस्था सुधारेल, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल, परिसरातील जमिनींच्या मूल्याला चालना मिळेल आणि स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध नागरी वसाहत निर्माण होण्यास मदत होईल.

महापालिका प्रशासनाने आता ठोस भूमिका घेण्याची गरज!

रस्त्यांच्या आरक्षणांसह उद्याने, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी उपयोगांसाठी राखीव असलेल्या जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात नसल्याने परिसराचा नियोजित विकास रखडला आहे. आरक्षणे केवळ विकास आराखड्यावर दाखवून उपयोग नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष ताबा घेऊन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने रहाटणी-काळेवाडी परिसरातील सर्व रस्ते आरक्षणे आणि सार्वजनिक हितासाठी राखीव असलेल्या जागांचा तातडीने आढावा घ्यावा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात घ्याव्यात, बाधितांना योग्य मोबदला द्यावा आणि रखडलेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत. अन्यथा या परिसरातील नागरिकांना अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleटाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद
Next Article वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 24, 20260

पिंपरी (प्रतिनिधी ).    : पुणेस्थित अजिल फायबरटेक प्रायव्हेट लिमिटेड या विशेष वाहनांच्या तसेच बसच्या…

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?