Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»अपघात»शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
अपघात

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
भरधाव कार दुभाजक ओलांडून आयशर ट्रकवर आदळली; दोघे गंभीर जखमी, मावळ परिसरावर शोककळा

सातारा,शिरवळ प्रतिनिधी, पिंपरी : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव टाटा नेक्सॉन कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (१९, तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (२०, कामशेत) यांचा मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी (२०, कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, बहुर, कामशेत) हे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, टाटा नेक्सॉन (एम एच१४ एलजे ३०३३) ही कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर कार आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि पलटी होत थेट विरुद्ध दिशेच्या सातारा–पुणे लेनमध्ये जाऊन पडली.

याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर ट्रक (के ए २७ सी ५८७८) सोबत कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यातील चार तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

एकाच कारमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मावळ परिसरासह मृतांच्या गावांवर शोककळा पसरली आहे. तरुण वयात चार कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखद आघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मावळ परिसरावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या अपघाताप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अपघाताचे नेमके कारण आणि वाहनाचा वेग याबाबत तपास केला जात आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगारांच्या हक्कांवर गदा आणाल तर ‘स्वराज्य’ गप्प बसणार नाही!
Next Article सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मद्यधुंद PMPML बसचालकाचा मेट्रोच्या कंपाऊंडला धडक

September 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?