Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा! … आमदार महेशदादा लांडगे
पिंपरी चिंचवड

नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा! … आमदार महेशदादा लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन;महापालिका, प्राधिकरण प्रशासनाला केली सूचना;राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत तात्पुरत्या निधीची तजवीज करा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी...पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड-राजगुरूनगर मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सूचना केली आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि खेड-राजगुरूनगरसह औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाचे एलिव्हेटेड कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, भूसंपादनासाठी राज्य सरकारचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी रखडल्याचे लांडगे यांनी नमूद केले आहे.

नाशिक फाटा ते चाकण आणि खेडदरम्यान वाढत्या नागरीकरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अवघ्या ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असून, नागरिकांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत PCMC आणि PMRDA यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातून तात्पुरता निधी उपलब्ध करून द्यावा. राज्य सरकारचा निधी प्राप्त झाल्यानंतर तो संबंधित संस्थांना परत करता येईल, असा पर्यायही त्यांनी सुचविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नाशिक फाटा ते खेड मार्गासाठी १ लाख २३ हजार ८४३ चौरस मीटर भूसंपादनाकरिता सुमारे २६२.७९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर PMRDA हद्दीतील १०.५०१३ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी सुमारे २८८ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देऊन PCMC आणि PMRDA यांच्या माध्यमातून भूसंपादनासाठी आवश्यक निधी उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या निर्णयामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळून पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल तसेच नागरिक, उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्राला वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. भूसंपादनासाठी निधीअभावी प्रकल्प रखडणे परवडणारे नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निधी उपलब्ध होईपर्यंत PCMC आणि PMRDA यांनी तात्पुरता निधी उपलब्ध करून भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या निर्णयामुळे प्रकल्पाला गती मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि लाखो नागरिक, उद्योजक व औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल.”

 – महेशदादा लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसासवड पोलिसांचा प्रतिबंधित गुटख्यावर मोठा घाव; ₹२९.७० लाखांचा साठा जप्त
Next Article दोन लाखांच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण; चौघांना अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?