Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पत्रकारांचा एल्गार; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी
पिंपरी चिंचवड

पत्रकारांचा एल्गार; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कारवाई न झाल्यास राज्यभर शिवसेना आणि लोकप्रतिनिधींच्या बातम्यांवर बहिष्काराचा इशारा

पिंपरी, दि.२७ जून : पत्रकारांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी चिंचवड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. संबंधित खासदार संजय दिना पाटील यांनी केवळ माफी मागून विषय संपणार नसून, त्यांच्यावर पक्षाने तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा राज्यभर शिवसेना पक्ष आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला.

चिंचवड येथील के.एस.बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. प्रारंभी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान “प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही गुन्हेगार!” अशा आशयाचे फलक झळकावण्यात आले. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे, तसेच विकास साळवे आणि संगीता पाचंगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा अथवा पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीवरील थेट हल्ला आहे. पत्रकार प्रश्न विचारणे थांबवणार नाहीत. संबंधित खासदारावर पक्षाने कारवाई केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विवेक कुलकर्णी, बजरंग मासाळ, संतोष महामुनी, रोहित खर्गे, नागेश खजुर्गीकर, पराग डिंगणकर, उमेश सणस, तौफीक सय्यद, गजाला सय्यद, आसीया इनामदार, उमेश पाटील, जगदीश बच्छाव यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.

आंदोलनाच्या शेवटी, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पक्षाकडून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास राज्यभर शिवसेना पक्ष आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मराठी पत्रकार संघाने स्पष्ट केले.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२८ जून रोजी शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*
Next Article बोगस डॉक्टर, बनावट औषध व अन्नभेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावा : रवींद्र ओव्हाळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?