Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»बोगस डॉक्टर, बनावट औषध व अन्नभेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावा : रवींद्र ओव्हाळ
पुणे

बोगस डॉक्टर, बनावट औषध व अन्नभेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावा : रवींद्र ओव्हाळ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भेसळ ओळखण्यासाठी राज्यभर जनजागृती शिबिरे घेण्याचीही मागणी

पिंपरी, दि.२७ जून : राज्यातील बोगस डॉक्टर, बनावट औषधांची निर्मिती व विक्री करणारे तसेच दूध आणि अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन ओव्हाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले असून, त्यात राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, नुकत्याच विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोडी व फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईचेही आश्वासन दिले.

रवींद्र ओव्हाळ यांनी सांगितले की, दापोडी विषारी दारू प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी त्यांनी ३० मे २०२६ रोजीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती. सरकारने या मागणीची गंभीर दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानले.

ओव्हाळ यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यात गुटखा बंदी असतानाही त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धाडी टाकून कारवाई सुरू केली असून, नागपूरसह विविध ठिकाणी बोगस डॉक्टर नागरिकांवर उपचार करत असल्याचे तसेच बनावट औषधे आणि दूध व अन्नधान्यात भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.

यामुळे नागरिकांनी बोगस डॉक्टरांकडून उपचार घेऊ नयेत तसेच बनावट औषधे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ कसे ओळखावेत, यासाठी शासनाने राज्यभर जनजागृती शिबिरे आयोजित करावीत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील बोगस डॉक्टर, बनावट औषध उत्पादक व विक्रेते तसेच दूध आणि अन्नधान्यात भेसळ करणाऱ्या टोळ्यांवरही ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी रवींद्र ओव्हाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्रकारांचा एल्गार; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी
Next Article गरीब व गरजू महिलांसाठी घरबसल्या रोजगाराची संधी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?