Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»२८ जून रोजी शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*
पिंपरी चिंचवड

२८ जून रोजी शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २६ जून २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत उद्या रविवार, दि. २८ जून रोजी संपूर्ण शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील ० ते ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार असून, पालकांनी आपल्या बालकांना जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

शहरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ११२३ पोलिओ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचा डोस देणार आहेत.

 

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

 

शहरातील सर्व महापालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे, बस स्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके तसेच स्थलांतरित नागरिकांच्या वस्त्यांमध्ये पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

० ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब देणे का आवश्यक आहे?

💮पोलिओसारख्या गंभीर आजारापासून प्रभावी संरक्षण मिळते.

💮पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.

💮बालकाची रोगप्रतिकारक क्षमता अधिक बळकट होते.

💮निरोगी, सुरक्षित आणि आनंदी बालपणासाठी संरक्षण मिळते.

💮भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यास हातभार लागतो.

💮यापूर्वी पोलिओचे सर्व डोस घेतले असले, तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेतील डोस घेणे आवश्यक असते.

💮नवजात तसेच किरकोळ आजारी असलेल्या बालकांनाही पोलिओची लस सुरक्षितपणे देता येते.

“पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने ही आपली सामाजिक जबाबदारी समजून मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. रविवार, दि. २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षांखालील बालकाला जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 

“राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या घरातील तसेच परिसरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी,”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगावठी देशी पिस्तुलासह फिरणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
Next Article पत्रकारांचा एल्गार; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?