Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»गावठी देशी पिस्तुलासह फिरणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र

गावठी देशी पिस्तुलासह फिरणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

यवतमाळ, प्रतिनिधी :…अवैधरित्या गावठी बनावटीचे देशी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली. आरोपीकडून एक गावठी देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपी शोध मोहिमेवर असताना गुप्त माहिती मिळाली. आंबोडा गावाजवळील तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव रवि संतोष शिंगारे (वय २९, रा. धर्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे देशी पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३२०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.धीरज बांडे,पो.उपनि.अमोल राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे यवतमाळ पोलिसांची सतर्कता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींकडून ३ पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त; गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई
Next Article २८ जून रोजी शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम*
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?