Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
महाराष्ट्र

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 10, 2026Updated:August 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ ऑगस्ट रोजी मुंबईत विशेष मराठी नाट्यप्रयोगाचे आयोजन

मुंबई, दि.१० ऑगस्ट : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ‘एक अटल भारत’ या विशेष मराठी नाट्यप्रयोगाचे आयोजन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी ६ वाजता दीनानाथ मंगेशकर सभागृह, विलेपार्ले (पूर्व), स्टेशनसमोर, मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रमास सर्व रसिकांसाठी विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे प्रख्यात संसदपटू, प्रतिभावान कवी आणि दूरदर्शी राष्ट्रनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने, लोकशाही मूल्यांवरील दृढ निष्ठेने आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणाऱ्या विचारांनी भारतीय राजकारणावर आणि सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटविला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा नाट्यप्रयोग त्यांच्या राष्ट्रदृष्टिकोनाला आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाला आदरांजली वाहणारा ठरणार आहे.

‘एक अटल भारत’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन विशाल सोनावणे यांनी केले असून, संकल्पना अमरजीत मिश्र यांची आहे. रविंद्र प्रोडक्शनच्या कलाकारांकडून या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार असून, अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारविश्वाचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी प्रवास रंगमंचावर प्रभावीपणे उलगडला जाणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध नाट्य, संगीत, लोककला आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे. देशभक्ती, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रनेत्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबई व परिसरातील नाट्यरसिक, विद्यार्थी, युवक, सांस्कृतिक उपक्रम प्रेमी आणि नागरिकांनी या विशेष नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘विद्यार्थी घडविणे म्हणजेच राष्ट्र घडविणे’
Next Article पुणे-नाशिक रेल्वेसह शिरूरच्या विविध प्रश्नांवर पंतप्रधान मोदींचे आश्वासन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026

उजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!

September 19, 2026

भिवडीत उमाजी नाईक जयंतीला जनसागर; शंकरराव गोफणे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?