Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राजकारण»पुणे-नाशिक रेल्वेसह शिरूरच्या विविध प्रश्नांवर पंतप्रधान मोदींचे आश्वासन
राजकारण

पुणे-नाशिक रेल्वेसह शिरूरच्या विविध प्रश्नांवर पंतप्रधान मोदींचे आश्वासन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

डॉ. अमोल कोल्हेंची पंतप्रधानांशी भेट; बिबट्यांचा प्रश्न, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टीसह औषधी वनस्पती संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा

पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित जुन्या मार्गानेच व्हावा, यासाठी जगातील १९ देशांमध्ये रेडिओ क्वाएट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी व मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. या मागणीबाबत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

बिबट्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न ऐरणीवर

जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढला असून, आतापर्यंत अनेक ग्रामस्थांचा, विशेषतः लहान मुलांचा बळी गेला आहे. त्यामुळे बिबट्याचा समावेश असलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यातील शेड्युल १ मधून त्याला वगळून शेड्युल २ मध्ये समावेश करावा, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली. या गंभीर विषयाची दखल घेत आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

इंद्रायणी मेडिसिटीला गती देण्याची मागणी

तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांनी राज्याच्या विधानसभेत इंद्रायणी मेडिसिटी या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र, घोषणा होऊन चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प अद्याप प्रलंबित असल्याचे डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. इंद्रायणी मेडिसिटीला गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

जुन्नरमध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राची मागणी

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासीबहुल भागात, विशेषतः जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींचे संवर्धन तसेच त्यावर संशोधन करण्यासाठी जुन्नर येथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली.

तत्कालीन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. या विषयातही लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

शिवनेरीच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्यासाठी गेल्या सहा-सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांना दिली.

‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यातून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील. तसेच देशातील नव्या पिढीबरोबरच परदेशी पर्यटकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची ओळख होईल, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

एमआयडीसीसाठी थेट न्हावाशेवा जोडणीची मागणी

तळेगाव, चाकण, रांजणगाव यांसह विविध एमआयडीसींमधील उद्योगांना सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. उद्योगांना मालवाहतुकीसाठी स्वस्त, वेगवान आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत उरण-तळेगाव-चाकण-संभाजीनगर असा नवीन समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग (Dedicated Freight Corridor) उभारण्यात यावा. या मार्गाद्वारे उद्योगक्षेत्राला थेट न्हावाशेवा बंदराशी जोडण्यात यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.

फुले दाम्पत्यांसह अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराजांना भारतरत्नची मागणी

महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणीही डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विषय पंतप्रधान मोदी यांनी आस्थेने समजून घेतले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासह बिबट्यांचा प्रश्न, इंद्रायणी मेडिसिटी, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र, ‘शिवसंस्कार सृष्टी’, मालवाहतूक रेल्वे मार्ग तसेच भारतरत्नाच्या मागणीबाबत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.मतदारसंघातील सर्व विषय आस्थेने समजून घेतल्याबद्दल डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
Next Article चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?