केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ज्योती दवणे यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सन्मान
पिंपरी-चिंचवड, दि. १० ऑगस्ट : पुणे जिल्हा परिषदेमध्ये केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल मा. ज्योती लक्ष्मण दवणे (घोलप) यांचा ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या वतीने आकुर्डी येथील संघटनेच्या मुख्य कार्यालयात शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथ रोकडे यांनी ज्योती दवणे यांची केंद्रप्रमुखपदी झालेली निवड ही त्यांच्या कर्तृत्वाची, गुणवत्तेची आणि निःस्वार्थ सेवाभावाची गौरवशाली पावती असल्याचे सांगितले. “विद्यार्थी घडविणे म्हणजेच राष्ट्र घडविणे असून, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा निश्चितच अनेक विद्यार्थ्यांना लाभ होईल,” असे त्यांनी नमूद केले.
संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर यांनी आपल्या मनोगतात संघटनेने केलेल्या भरीव कार्यामुळे आज संघटना संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य ठरली असून, हे कार्य यापुढेही अखंडपणे सुरू राहील, अशी ग्वाही दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी संघटनेच्या विविध प्रकरणांची माहिती देत सामाजिक व मानवाधिकार क्षेत्रातील कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.
राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत यांनी सन्मानमूर्ती ज्योती दवणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, तुळशीराम घोलप, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन गाडे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा अरुणा गायकवाड होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून ज्योती दवणे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल सोरटे यांनी केले.
पदाधिकारी व सदस्यांची मोठी उपस्थिती
यावेळी मुळशी तालुकाध्यक्ष विशाल भानुसे, मावळ तालुकाध्यक्ष कांतीलाल सोरटे, खेड तालुकाध्यक्ष अतुल दवणे, सिंदखेड तालुकाध्यक्ष प्रकाश बागल पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन गाडे पाटील, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष केतन राजने, शहर महिला उपाध्यक्षा अरुणा गायकवाड, मावळ तालुका उपाध्यक्ष प्रतीक कांबळे, पुणे जिल्हा सचिव डॉ. सतीश नगरकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अप्पासाहेब कांबळे, मुळशी तालुका सचिव अविनाश भोसले, खेड तालुका उपाध्यक्ष संतोष दवणे, संघटक दत्तात्रय भोसले, खेड तालुका सचिव गोविंद लिंगायत, मावळ तालुका उपाध्यक्ष रवींद्र आडकर, खेड तालुका कायदे सल्लागार विठ्ठल नाणेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जामहीन राजांना सुतार, राजीव नर्सिंग, नागनाथ मस्के, सुशील राक्षे, हिराजी नाईकवाडे, उत्तरेश्वर नायकोडी, मारुती बबन सोरटे, विशाल बनसोडे, शंकर वाढवे, धोंडीराम शिंदे, डी. एस. सूर्यवंशी, दीपक दवणे, सरोज हिवाळे, तुलसीदास, नम्रता नलगे, गणेश चिखले आदी उपस्थित होते.
