Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त पिंपरीत भाजपचा ‘महासंकल्प’;काँग्रेसच्या काळ्या इतिहासाचा निषेध
पिंपरी चिंचवड

आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त पिंपरीत भाजपचा ‘महासंकल्प’;काँग्रेसच्या काळ्या इतिहासाचा निषेध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी: २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा काळा इतिहास समोर आणण्यासाठी पिंपरी येथे भाजप युवा मोर्चातर्फे ‘युवा संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी लोकशाही रक्षणाचा महासंकल्प केला. भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आणीबाणीच्या काळातील जुलमी राजवटीचा भाजप पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र निषेध केला.

संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा बुरखा फाडणे आवश्यक: शत्रुघ्न काटे

युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “२५ जून १९७५ हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी संपूर्ण देशात आणीबाणी लादली, लाखो देशभक्तांना तुरुंगात डांबले आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. ज्या काँग्रेसने लोकशाही संपवण्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करण्याचे पाप केले, त्यांचा खरा चेहरा आजच्या युवा पिढीसमोर आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.”

लोकशाही रक्षणाचा निर्धार

या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनरुज्जीवनासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व कडक तुरुंगवास सोसणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि देशभक्तांना मनोभावे नमन करण्यात आले. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी एकमुखी संकल्प केला की, “भविष्यात जर कोणीही भारताची लोकशाही आणि संविधान संपवण्याचा किंवा त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचा प्रत्येक युवा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल आणि लोकशाहीचे रक्षण करेल.”

या कार्यक्रमाला संघटन सरचिटणीस व कार्यक्रम संयोजक श्री. मोरेश्वरभाऊ शेडगे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दिनेशभाऊ यादव, नगरसेवक श्री. सुरेशभाऊ भोईर, श्री. मंदार देशपांडे, सागर गवळी, श्री. अजयभाऊ पाताडे, श्री. अजितभाऊ कुलथे, श्री. दिनेश काटे पाटील, श्री. कैलासभाऊ सानप, श्री. देवदत्तभाऊ लांडे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि विविध आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच सम्यक साबळे, राहुल खाडे, दिनेश काटे, सुमित घाटे, राजेश डोंगरे, कृष्णा कदम, प्रशांत अलमेल, प्रदीप महाजन, यश संभेराव, ऋषिकेश भालेकर, शरद भालेकर, आदित्य कुलकर्णी, दिपराज गुप्ता, रमेश वहीले, अमित देशमुख, आशिष राऊत, गोपाल मंडल, निखिल शहाणे, अभिजीत बागुल, प्रथमेश रुपनर, जगदीश येवले, स्वप्निल गाडे, रोहित कराळे, विजय दळवी, मयूर काळभोर, विवेक बारोट, सतीश नागरगोजे, प्रदीप नाईक, अजिंक्य गोळे, संग्राम खाडे, दयानंद बंडगर, प्रतीक भालेराव यांसह पिंपरी- चिंचवडमधील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 18
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकारी,अधिकाऱ्यांसाठी ‘इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण’ राबविणार :- सभापती अभिषेक बारणे
Next Article खा.संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी अवमानकारक केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?