Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकारी,अधिकाऱ्यांसाठी ‘इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण’ राबविणार :- सभापती अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकारी,अधिकाऱ्यांसाठी ‘इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण’ राबविणार :- सभापती अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड: पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वाहनव्यवस्थेत पर्यावरणपूरक बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे आणि क्रांतिकारी पाऊल उचलण्यात येत आहे. आगामी काळात महापालिकेच्या महापौर, आयुक्त, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या अधिकृत प्रवासासाठी ‘इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण’ निश्चित करण्यात येणार आहे. अशी माहिती स्थायी सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

शहरातील वाढते प्रदूषण कमी करणे आणि इंधनावरील खर्च मर्यादित ठेवणे या दुहेरी उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महापालिकेच्या माध्यमातून विविध पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या धोरणांतर्गत आता इंधनवर चालणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याऐवजी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा हॅरियर ईव्ही आणि महिंद्रा ईव्ही यांसारख्या आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे महापालिकेची ‘ग्रीन मोबिलिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू होणार असून, ‘ग्रीन नंबर प्लेट’ असलेली ही वाहने महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात आधुनिकता आणि पारदर्शकता आणतील. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरात आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशन्सची उभारणी आणि अन्य तांत्रिक बाबींचा आढावा प्रशासनाकडून घेतला जात आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय बदल नसून, शाश्वत शहर विकासाच्या दृष्टीने टाकलेले एक दूरदृष्टीचे पाऊल आहे, ज्यामुळे प्रदूषणमुक्त शासकीय वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.

या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड हे प्रगत आणि स्मार्ट शहर आहे, त्यामुळे प्रशासनानेही काळाची पावले ओळखून पर्यावरणपूरक धोरणे स्वीकारणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणामुळे महापालिकेचा इंधन खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच, पर्यावरणाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.

“सध्या अनेक पदाधिकाऱ्यांकडे वैयक्तिक वाहने असली, तरी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय अधिक किफायतशीर आहे. लोकप्रतिनिधींनी अशी वाहने वापरल्यास समाजात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश जाईल आणि नागरिकांमध्येही इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागरूकता व आकर्षण निर्माण होईल. महापौर आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे धोरण लवकरच पूर्णपणे अंमलात आणले जाईल, ज्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड महापालिका एक ‘ग्रीन’ मॉडेल म्हणून ओळखली जाईल.”

– अभिषेक बारणे, सभापती : स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमेट्रो विस्तार, जलनिस्सारण सुधारणा, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा व विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
Next Article आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त पिंपरीत भाजपचा ‘महासंकल्प’;काँग्रेसच्या काळ्या इतिहासाचा निषेध
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?