Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मेट्रो विस्तार, जलनिस्सारण सुधारणा, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा व विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी चिंचवड

मेट्रो विस्तार, जलनिस्सारण सुधारणा, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा व विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 25, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

धोरणात्मक निर्णयातून शहराच्या विकासाला प्राधान्य : सभापती अभिषेक बारणे

पिंपरी, दि. २४ जून २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जलनिस्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, नागरी सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासंदर्भातील प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.

यावेळी स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो फेज-१ विस्तार प्रकल्पांतर्गत निगडी येथील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली. पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गिकेवरील या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्याचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे निगडी परिसरातील नागरिकांना मेट्रो सेवेचा अधिक व्यापक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध कामांना मान्यता देण्यात आली. इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दिघी, बोपखेल व परिसरातील मलनिस्सारण नलिकांमध्ये सुधारणा करण्याचे काम तसेच दापोडी पंपिंग स्टेशन ते दापोडी एस.टी. स्टँड दरम्यानच्या रायझिंग मेन जलनिस्सारण वाहिनीचे उन्नतीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मामुर्डी येथील साईनगर उंच जलकुंभाच्या जलक्षेत्रात नव्याने विकसित होत असलेल्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.

शहरातील वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पुनावळे येथील अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी आवश्यक सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, प्रशासकीय इमारती आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमधील अग्निशामक यंत्रणांच्या देखभाल, दुरुस्ती व कार्यक्षमतेसाठी आवश्यक कामांना मान्यता देण्यात आली.

नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोनोग्राफी यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभालीस मंजुरी देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील १४ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडील वार्षिक मान्यताप्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या विविध प्रभागांमधील विद्युत विषयक कामे सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास तसेच कै. अण्णासाहेब मगर सदनिका संकुल व केशवनगर-चिंचवड परिसरातील विद्युत वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

शहरातील शैक्षणिक व नागरी सुविधांच्या उन्नतीकरणासाठी प्रभाग क्रमांक १ मधील महापालिका शाळा क्रमांक ९० व २१ यांच्या दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील कोयनानगर, मोरया हाऊसिंग सोसायटी परिसर आणि सीडीसी परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्ट्रक्चरल ऑडिटनुसार आवश्यक दुरुस्तीची कामे तसेच महापालिका सभागृहाचे नूतनीकरण करण्यासाठी प्राप्त निविदांना मान्यता देण्यात आली. याशिवाय अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात आलेल्या रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या व गटारांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

शहरातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित विविध स्पर्धा व प्रशिक्षण उपक्रमांसाठी आवश्यक क्रीडा साहित्य खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘अभिव्यक्ती कलामहोत्सव’ आयोजित करण्यास आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली.

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने डेंग्यू प्रतिबंधासाठी ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत औष्णिक धुरीकरणासाठी आवश्यक वाहनसेवा सुरू ठेवण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली. तसेच भोसरी येथील शांतीनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, देखभाल व व्यवस्थापन अखंडित सुरू राहावे यासाठी रोहिणी महिला बचत गटास मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

आपत्कालीन परिस्थितींमध्ये अधिक प्रभावी प्रतिसाद देता यावा यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागासाठी गॅस डिटेक्टर उपकरणे खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे धोकादायक वायू गळतीसारख्या घटनांमध्ये तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होण्यास, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

”पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी स्थायी समितीने आज विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली आहे. मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था सक्षमीकरण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा, रस्ते विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मंजूर करण्यात आलेले सर्व प्रकल्प आणि कामे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणतील, असा विश्वास आहे.”

……..अभिषेक बारणे,सभापती, स्थायी समिती,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व २२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकारी,अधिकाऱ्यांसाठी ‘इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण’ राबविणार :- सभापती अभिषेक बारणे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?