Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»लोहगडवरील ‘अपघात’ नव्हे तर खून; होणारी पत्नी व प्रियकर अटकेत
पुणे ग्रामीण

लोहगडवरील ‘अपघात’ नव्हे तर खून; होणारी पत्नी व प्रियकर अटकेत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे | प्रतिनिधी.….प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल देवीचंद अगरवाल यांचा मुलगा केतन अगरवाल (वय २५) याचा लोणावळ्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात मानली जात होती. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास करत या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा केला असून, केतनचा खून त्याच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सिया प्रविण गोयल (वय २०, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) अशी आहेत. १८ जून रोजी, स्वतःच्या वाढदिवशीच केतनचा मृत्यू झाल्याने पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

घटनेनंतर सिया गोयल हिने केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता, केतन त्यांच्या संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी कट रचल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या वाढदिवशी त्याला लोहगडावर फिरायला नेण्यात आले आणि संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आले. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तपासातील तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा कट उघडकीस आणला.

केतन अगरवाल याचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे शाही पद्धतीने होणार होता. त्यासाठी पॅलेससह दोन विमानेही बुक करण्यात आली होती. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने अगरवाल कुटुंबासह दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. प्रॉपर्टी वाद, वैयक्तिक वैमनस्य किंवा प्रेमसंबंध या सर्व शक्यतांचा तपास करण्यात आला. त्यातून सिया गोयल हिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आणि पुढील चौकशीत खुनाचा कट उघड झाला.

यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद रद्द करून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सदर ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल,अप्पर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोप्पे आणि पोलिस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक अभिजीत सावंत आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामठवाडीत धार्मिक उत्साहाचे पर्व; श्री कानिफनाथ, शिव व खंडोबा मंदिरांचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्या
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचे ‘तुडवा आंदोलन’; सहा खासदारांच्या पक्षांतराचा निषेध
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामठवाडीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

August 9, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री कातोबा हायस्कूलमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 1, 2026

शाळा गुणवत्ता मूल्यांकनात मठवाडी शाळेचा गौरव

July 24, 2026

पुणे गणेशोत्सवात झळकणार श्रीक्षेत्र खामुंडीच्या स्वयंभू काळभैरवनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती

July 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?