Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार
पिंपरी चिंचवड

४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ८ दिवस

पिंपरी, दि. २२ जून २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनात ४१२ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाख ६५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी जवळपास ४१२ कोटी ९७ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला असून, कर संकलनात सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांपैकी वाकड विभागाने सर्वाधिक ५६.३९ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे. तसेच, त्याखालोखाल थेरगाव विभागाने ३७.३६ कोटी, कस्पटे वस्ती विभागाने ३२.९१ कोटी, किवळे विभागाने ३०.३८ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे.

याचबरोबर मालमत्ता कराच्या सामान्य करावर विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. सवलतींची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित मालमत्ता कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.

महापालिकेकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेऊन ३५८ कोंटींचा ऑनलाईन भरणा केला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमधील मालमत्ता कर काउंटर शनिवार व रविवारदेखील सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही आपल्या जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरता येणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनुसार वसुल

१. वाकड – ५६.३९ कोटी

२. थेरगाव – ३७.६६ कोटी

३. कस्पटे वस्ती – ३२.९१ कोटी

४. किवळे – ३०.३८ कोटी

५. चिखली – २९.८१ कोटी

६. चिंचवड – २७.६२ कोटी

७. भोसरी – २५.६८ कोटी

८. पिंपरी-वाघेरे – २५.४० कोटी

९. मनपा भवन – २४.०३ कोटी

१०. मोशी – २३.६६ कोटी

११. सांगवी – २१.९२ कोटी

१२. आकुर्डी – १६.७३ कोटी

१३. फुगेवाडी-दापोडी – १४.३६ कोटी

१४. चऱ्होली – १४.११ कोटी

१५. निगडी प्राधिकरण – १०.४४ कोटी

१६. दिघी-बोपखेल – ९.६९ कोटी

१७. तळवडे – ९.२८ कोटी

१८. पिंपरी नगर – २.८१ कोटी

एकूण कर संकलन– ४१२.९७ कोटी रुपये*

“पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात प्रत्येक करदात्याचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरल्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देता येतात. महापालिकेने विविध सवलती उपलब्ध करून दिल्या असून, नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावा”

….. रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत आहे. शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसह विविध विकासकामांसाठी या निधीचा उपयोग केला जातो. ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत तसेच इतर विविध सवलती उपलब्ध आहेत. नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित कर भरणा करून सवलतींचा लाभ घ्यावा”

……डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये शनिवार व रविवारदेखील मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवसांतील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी जवळच्या विभागीय कार्यालयात किंवा ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरावा. वेळेत कर भरणे हे जबाबदार नागरिकत्वाचे प्रतीक असून, त्यातून शहर विकासालाही चालना मिळते.

…… तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडच्या २१ खेळाडूंची भारतीय संघात निवड
Next Article अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?