Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»एआय साठी जास्त रोजगार आणि गुंतवणूक भविष्यात भारतामध्ये – विवेक वेलणकर
पुणे

एआय साठी जास्त रोजगार आणि गुंतवणूक भविष्यात भारतामध्ये – विवेक वेलणकर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भारतात एआय क्षेत्रात रोजगार व गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; बीएससी (ऑनर्स) एआय-अँड-एमएल अभ्यासक्रम उपयुक्त

पिंपरी, दि.१६ जून २०२६ : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे भविष्यात भारतात रोजगार आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण होणार असून, एआय व मशीन लर्निंग (एमएल) क्षेत्रातील कौशल्यांना मोठी मागणी राहणार आहे, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले.

पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (बाटु) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अमित शेष, ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्सचे संस्थापक व सीईओ डॉ. संजय गांधी, डॉ. शैलेंद्र शुक्ला, मंदार हलभावी, उद्योजक मनोज देशमुख आणि प्रशांत पुंड उपस्थित होते.

विवेक वेलणकर म्हणाले की, संगणक आणि मोबाईलप्रमाणेच एआयदेखील लवकरच सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल. शिक्षण, शेती, उद्योग, वैद्यकीय, वाणिज्य आणि सेवा क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे पारंपरिक कोडिंग आणि प्रोग्रामिंग क्षेत्रातील काही नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो; मात्र एआय टूल्स विकसित करणारे, मशीन लर्निंग तज्ज्ञ आणि नव्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या व्यावसायिकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालय निवडताना कॅम्पस प्लेसमेंट व इंटर्नशिपच्या संधींना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. अमित शेष यांनी सांगितले की, बाटु आणि ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बीएससी (ऑनर्स) या अभिनव पदवी अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत उद्योगक्षेत्रातील अनुभव मिळावा यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ९२ स्टार्टअप्स सुरू झाले असून, राष्ट्रीय इन्क्युबेशन स्टार्टअप धोरणांतर्गत दरवर्षी २५ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

प्रास्ताविकात डॉ. संजय गांधी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संस्था कार्यरत असून १०० हून अधिक स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यात आले आहे. बारावीनंतरचा चार वर्षांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बीएससी (ऑनर्स) अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एआयसोबत क्वांटम कॉम्प्युटिंगचे ज्ञानही देणार आहे. चौथ्या वर्षात उद्योग क्षेत्रात इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना स्टायपेंड आणि कामाचा अनुभव प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या पदवीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिधा गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमित गांधी यांनी केले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश; शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मानधन शिक्षक रुजू
Next Article महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आदर्श केंद्रे बनतील – महापौर रवि लांडगे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?