पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तसेच संसदीय कार्य मंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत जनसेवेच्या कार्याला अधिक बळ मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दादांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जनहिताची कामे अधिक जोमाने पुढे जावीत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी भाजप पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस मधुकरभाऊ बच्चे, राजेश आण्णा पिल्ले, कोषाध्यक्ष राजाभाऊ मासूळकर, नामदेवराव ढाके, युवा मोर्चाचे दीपक नागरगोजे, पुण्याचे युवा नेते लहूभाऊ बालवडकर, भूषणशेठ काटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
