Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»२२ हजार ९०६ मालमत्ताधारकांच्या शास्तीचे हाेणार समायाेजन
पिंपरी चिंचवड

२२ हजार ९०६ मालमत्ताधारकांच्या शास्तीचे हाेणार समायाेजन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

१६४ काेटींची टप्या-टप्याने हाेणार समायाेजन

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील २०२३ पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर राज्य सरकारने माफ केल्यानंतर आतापर्यंत ९६ काेटी १२ लाख रूपयांचे समायाेजन केले आहे. २०२६-२७ या वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचेही मालमत्ता करामध्ये समायाेजन करण्यास बुधवारी (दि.१०) स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना २०१२-१३ पासून शास्तीकर वसूल केला जात हाेता. ३ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ मार्च २०२३ पूर्वी झालेल्या २५ हजार ६७३ अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळाला. या मालमत्ता धारकांनी शास्तीकराची २६० काेटी ५३ लाख रूपयांची रक्कम महापालिकेकडे जमा केली हाेती.

शास्ती कर माफीचा निर्णय झाल्यानंतर २०२३-२४ मध्ये २२ हजार ५१२ मालमत्ता धारकांना ३० काेटी ३ लाख, २०२४-२५ मध्ये २५ हजार ६७३ मालमत्ता धारकांना ३५ काेटी ९५ लाख, २०२५-२६ मध्ये २१ हजार ८२४ मालमत्ता धारकांना ३० काेटी १४ लाख असे ९६ काेटी १२ लाख रूपयांची रक्कम मालमत्ता करामध्ये समायाेजित केली. त्यानंतरही २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांची १६४ काेटी ४१ लाख रूपयांची रक्कम मालमत्ता करामध्ये समायाेजित करणे बाकी आहे. त्यानुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षात १६४ काेटी ४१ लाखांपैकी जेवढी शक्य आहे, त्यानुसार ती रक्कम समायाेजित केली जाणार आहे. या समायाेजनाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

“शहरातील २५ हजार ६७३ मालमत्ता धारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरून मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला हाेता. राज्य सरकारने २०२३ मध्ये शास्तीकर माफीचा निर्णय घेतला. त्यामुळे शास्तीकर भरलेल्या नागरिकांची रक्कम २०२३-२४ पासून त्यांच्या मालमत्ता करातून समायाेजित केली जात आहे. आतापर्यंत २६० काेटी ५३ लाखापैकी ९६ काेटी १२ लाख रूपये समायाेजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांनी कर भरू नये. त्यांची आगाऊ भरलेली रक्कम मालमत्ता करात समायोजित केली जाणार आहे”
….. अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती. पिंपरी चिंचवड महापालिका 
“अनधिकृत बांधकाम धारकांच्या बिलामध्ये शास्ती कराचे समायाेजन केले जात आहे. ही रक्कम माेठी असल्यामुळे एका वर्षात समायाेजन हाेऊ शकत नाही. दरवर्षी मालमत्ता धारकांच्या बिलानुसार समायाेजन केले जात आहे.  २०२६-२७ या आर्थिक वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचे समायाेजन केले जाणार आहे. महापालिकेकडे १६४ काेटी ४१ लाख रूपये समायाेजन करणे बाकी आहे. ही रक्कम टप्या-टप्याने दरवर्षी समायाेजित केली जात आहे”
…… तृप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका
Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत उत्साहात साजरा
Next Article चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा;शंकरभाऊ जगताप व शत्रुघ्न (बापू) काटे यांची सदिच्छा भेट
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?