इंदापूर, प्रतिनिधी दि. ३१ मे : इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील अल्पवयीन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची शिवशाही शासन व हिंदू मातंग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी पीडित मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी केली.
भेटीदरम्यान दाखले यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना कायदेशीर, सामाजिक व आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवराज दाखले म्हणाले, “पीडित मुलगी ही समाजाची लेक आहे. तिच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत संघटनेकडून करण्यात येईल. तसेच प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
यावेळी संबंधित प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पीडितेला न्याय द्यावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
या प्रसंगी उषामाई कांबळे, सुनील (दादासाहेब) झोंबाडे, तात्यासाहेब यादव, बाळासाहेब चांदणे यांच्यासह शिवशाही शासन व हिंदू मातंग सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आवश्यक ती मदत करण्याचा निर्धार यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
