पुणे प्रतिनिधी –आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजथोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांच्या सुश्राव्य व मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, ३१ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत हरिनामाच्या गजरात संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तापकीर यांनी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञदिली.
पुरुषोत्तम मास हा नामचिंतन, श्रवणश्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, भजन आणि कीर्तनासाठी पर्वणी मानला जातो. या निमित्ताने मंदिरात काकडा, हरिपाठ, महिला भजन, हरिजागर आदी विविध धार्मिकश्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांची श्रीमद् भागवत कथा होणार असून भाविकांना अध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळणार आहे.
या धार्मिक पर्वणीत भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे