Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»खंडणीविरोधी पथकाची धडक कारवाई; ५० हजारांची पिस्टल जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

खंडणीविरोधी पथकाची धडक कारवाई; ५० हजारांची पिस्टल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन आरोपी ताब्यात; शस्त्र पुरवणाऱ्या तिसऱ्या आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत रेकॉर्डवरील दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी यश अनिल शिंदे (वय २२) याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची लोखंडी पिस्टल जप्त करण्यात आली. या प्रकरणी शस्त्र पुरवणाऱ्या तिसऱ्या आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना यश शिंदे आणि प्रज्वल सुधीर जाधव (वय २२, दोघेही रा. आंबेगाव, जि. पुणे) यांच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४० च्या सुमारास नाणेकरवाडी येथील माऊली पार्कच्या कमानीजवळ, एमआयडीसी रोड परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

यश शिंदे याच्याकडून पिस्टल जप्त केल्यानंतर चौकशीत त्याने हे शस्त्र प्रज्वल जाधव याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तर प्रज्वलने हे शस्त्र त्याचा मित्र फारूख अन्सार पठाण (वय २५, रा. बालाजीनगर, चाकण) याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), भारतीय हत्यार कायद्याचे कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. ताब्यातील दोघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी दक्षिण चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनगरसचिव नियुक्तीप्रकरणी चौकशीची मागणी
Next Article बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे ब्लॅकमेलिंग; ५० हजारांची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?