Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे ब्लॅकमेलिंग; ५० हजारांची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे ब्लॅकमेलिंग; ५० हजारांची खंडणी मागणारा आरोपी जेरबंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मैत्रिणीकडे शारीरिक संबंधांची मागणी; खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी प्रतिनिधी: बनावट इन्स्टाग्राम आयडीच्या माध्यमातून तरुणाला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्याच्या मैत्रिणीकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. हनुमान सुभाष खरात (वय ३५, मूळ रा. वरुडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल, मोबाईल, पाकीट, आधारकार्ड व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘RuchitaNikam93’ या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला होता. या आयडीवरून फिर्यादीला अश्लील छायाचित्र पाठवून त्याच्याकडूनही खासगी छायाचित्र मागवण्यात आले. त्यानंतर संबंधित छायाचित्रे आणि दोघांमधील संभाषण कार्यालयीन मोबाईलवर तसेच फिर्यादीच्या पार्टटाइम नोकरीच्या ठिकाणी पाठवण्याची धमकी देण्यात आली. छायाचित्रे प्रसारित न करण्याच्या बदल्यात आरोपीने ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

इतकेच नव्हे, तर फिर्यादीच्या मैत्रिणीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून फिर्यादीला त्रास होऊ द्यायचा नसेल, तर आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवावेत किंवा पैसे पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा फिर्यादीला मारहाण करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले. तसेच, फेसबुकवरूनही धमकीवजा संदेश पाठवण्यात आले.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(३), ३५१(२) आणि ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने संबंधित मोबाईल क्रमांकांचा तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेतला. हनुमान खरात याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल संत तुकारामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, रमेश गायकवाड तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी केली.

खंडणीसंदर्भात तक्रार करण्याचे आवाहन

नागरिकांकडे कोणी खंडणीची मागणी केली असेल किंवा कोणी अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचा बळी ठरले असेल, तर त्यांनी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा किंवा संत तुकारामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleखंडणीविरोधी पथकाची धडक कारवाई; ५० हजारांची पिस्टल जप्त
Next Article मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! तीन पुलांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’ संकल्पनेला गती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?