Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोशीतील पेट्रोल पंपावर पिस्तूल रोखून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; चौघांना अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोशीतील पेट्रोल पंपावर पिस्तूल रोखून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; चौघांना अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

इंजिन ऑईलवर डिस्काउंट न दिल्याच्या रागातून दहशत; एमआयडीसी भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड, दि. १९ ऑक्टोबर : मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपावर इंजिन ऑईलवर सवलत न दिल्याच्या रागातून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य एका आरोपीचाही गुन्ह्यात उल्लेख आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास वाघजाई पेट्रोल पंप, मोशी येथे घडली. फिर्यादी रेवन राजाराम पांढरे (वय ३३) हे पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून चार जण पेट्रोल पंपावर आले. त्यापैकी दोघांनी इंजिन ऑईलची किंमत विचारली. कर्मचाऱ्याने मॅक कंपनीच्या एक लिटर ऑईलची किंमत ३६९ रुपये असल्याचे सांगितले.

सुरुवातीला किंमत जास्त असल्याचे सांगून ऑईल घेण्यास नकार देणारे हे दोघे काही वेळाने पुन्हा कर्मचाऱ्याकडे आले आणि त्यांनी एक लिटर ऑईल खरेदी केले. त्यानंतर त्यांनी सवलतीची मागणी केली; मात्र सवलत मिळणार नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी यूपीआयद्वारे ३६९ रुपये भरले.

डिस्काउंट न मिळाल्याने पिस्तूल रोखले

सवलत न दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ‘तुला पाहून घेतो, मी देवा जमादार आहे, मला ओळखत नाही का? तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकी देत एका आरोपीने कमरेला लावलेले पिस्तूल काढून कर्मचाऱ्याच्या दिशेने रोखले. त्यामुळे पेट्रोल पंपावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरात जमलेले ग्राहकही घाबरून पळून गेले. त्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (एमएच १२ क्यूडब्ल्यू ०२८९) घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा क्रमांक ८४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी देवानंद ऊर्फ देवा भिमाशंकर जमादार (वय २९), सुलतान इसुफ खान (वय ३२), विलास धाऊ ढेबे (वय २९) आणि काशिनाथ कल्याण काळे (वय २८) या चार आरोपींना अटक केल्याची नोंद आहे. कुणाल साहेबराव रणवीर (वय अंदाजे २२) याचाही आरोपी म्हणून उल्लेख आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड शहर ‘भाजपा’ची नैतिकता संपली का?- धनराज आसवानी 
Next Article एक ‘कॉल’ अन् प्रॉब्लेम ‘सॉल्व्ह’!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?