Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»तळवडेत वृद्ध महिलेचे हातपाय बांधून ७३ तोळे सोन्याची लूट; तिघांना आठ तासांत अटक!
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

तळवडेत वृद्ध महिलेचे हातपाय बांधून ७३ तोळे सोन्याची लूट; तिघांना आठ तासांत अटक!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिखली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ५७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

पिंपरी-चिंचवड : तळवडे येथील ज्योतीबानगर परिसरात ६० वर्षीय महिलेचे हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवत मारहाण करून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व अन्य ऐवज लुटणाऱ्या तिघांना चिखली पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाने अवघ्या आठ तासांत अटक केली. आरोपींकडून अंदाजे ७३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची पैंजणे, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व हत्यारे असा एकूण ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री एक ते सव्वा एकच्या सुमारास घडली. भारती मारुती भालेकर (वय ६०, रा. ज्योतीबानगर, तळवडे) या घरात झोपलेल्या असताना तीन अनोळखी व्यक्तींनी हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी भालेकर यांचे हातपाय बांधले, त्यांच्या तोंडावर साड्या टाकल्या आणि मारहाण करत चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीची पैंजणे, मोबाईल आणि घड्याळ असा ऐवज घेऊन आरोपी पसार झाले.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ३११, ३३१(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.

या तपासातून अनारुल्ला मजहरउल्ला चौधरी (वय ३६, रा. चिखली), अब्दुल रहिम मजिद मोमीन (वय ३९, रा. कांदिवली, मुंबई) आणि समिउल्ला अजमतउल्ला खान (वय ३२, रा. मुंब्रा, ठाणे) यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

७३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

आरोपींनी लपवून ठेवलेले अंदाजे ७३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या तीन जोड पैंजणांसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व हत्यारे पोलिसांनी जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ५७ लाख ८७ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण तसेच पोलीस अंमलदार किरण काटकर, विनोद व्होनमाने, कंठव्या स्वामी, प्रविण भोमाळे, सूरज सुतार, अरुण साबळे, संतोष भालेराव, अजय गायकवाड, भरत माने, नवनाथ कुन्हे, अनिल राक्षे आणि संतोष भोर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा
Next Article रस्त्यावरील रेलींग व दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी मैलाशुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?