Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा
पिंपरी चिंचवड

चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी प्रतिनिधी…..पिंपरी-चिंचवड शहर कलाप्रेमी मंचाच्या वतीने चिंचवड येथील तारांगण सभागृहात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कलाकार, साहित्यिक आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते.

यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर, लेखक प्रभाकर ओव्हाळ, काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, निहाल पानसरे, आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे यांनी मधू कांबीकर यांनी, कोल्हाटी समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. तर भाऊसाहेब भोईर यांनी कलाकार कधीच आपल्या आठवणींतून दूर जात नाही, असे सांगत त्यांच्या कलेचा वारसा कायम जिवंत राहत असल्याची भावना व्यक्त केली.ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांनी, मधू कांबीकर यांच्यासोबत नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करतानाचे अनुभव सांगत मधुताई आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी नाना पाटेकर यांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की नाना पाटेकर हे एक वेगळेच रसायन असलेले अभिनेते होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रमाणे वेळोवेळी त्यांनी भूमिका घेतली. पु ल देशपांडे प्रकरणात शिवसेनाप्रमुखांना एक दिवस मागे वळून पाहाल तर एकटेच उरलेले असाल हा नानांनी घेतलेला चिमटा, देवेंद्र फडणवीस यांना भाषण छान करतोस मात्र ओरडून बोलू नकोस नाहीतर त्रास होईल तुला हा त्यांनी दिलेला सल्ला, एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना राजकीय मंडळींची प्रॉपर्टी निवडून आल्यावर वर्षभरात वाढते कशी हा त्यांनी केलेला सवाल सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणारा होता. नानांनी धीर गंभीर बंडखोर विनोदी सगळ्या भूमिका जीव ओतून केल्या. असे सातुर्डेकर म्हणाले.

दादा आढाव यांनी मधू कांबीकर यांच्यासोबतच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. अश्विनी सातव यांनी दोन्ही कलाकारांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात माणुसकी जपण्याचे आवाहन केले.

सूत्रसंचालन पत्रकार गोविंद वाकडे यांनी केले, पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. अविनाश कांबीकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून सभेचा समारोप केला.या कार्यक्रमासाठी अनिल माने, प्रवीण तुपे, अनिस पठाण, विष्णू मांजरे,गणेश दिघे व नितीन भोगले यांनी पुढाकार घेतला.

मधू कांबीकर यांनी केलेल्या मदतीमुळेच वसतिगृहाची झाली उभारणी- पद्मश्री गिरीश प्रभुणे

कोल्हाटी समाजातील मुलींनी नाचगाणी सोडून शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी मी उभारत असलेल्या वसतिगृहाला मधू कांबीकर यांनी केलेल्या २५ हजार रुपयांच्या मदतीमुळेच सामाजिक समरसतेचा प्रवास पुढे निर्धोकपणे पार पडला असे प्रभुणे यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधनावर भर द्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article तळवडेत वृद्ध महिलेचे हातपाय बांधून ७३ तोळे सोन्याची लूट; तिघांना आठ तासांत अटक!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?