Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधनावर भर द्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई

सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधनावर भर द्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन व नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शासनाचे सहकार्य

मुंबई, प्रतिनिधी : औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन व नवोन्मेषाला चालना देऊन आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, किफायतशीर आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास या क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक धोरणात्मक व अन्य सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव येथील मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, एशियाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताने जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियमन असलेल्या बाजारपेठांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांची मोठी मागणी आहे. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे. आता या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात उभारण्यात येणारा बल्क ड्रग पार्क महत्त्वाचा ठरणार असून, त्यातून औषधनिर्मिती क्षेत्रात व्यापक बदल घडतील, असे त्यांनी नमूद केले.

ॲस्ट्राझेनेकाने कोविड-१९ महामारीच्या काळात केलेले योगदान भारत कधीही विसरणार नाही. कोविशिल्ड लसीमुळे देशातील नागरिकांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत भारताने ९९ देशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृतीची भावना जगासमोर प्रत्यक्षात आली. या कार्यात ॲस्ट्राझेनेकाचे योगदान महत्वपूर्ण होते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आरोग्यसेवेतील बदलांसाठी नवोन्मेष महत्वाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औषधनिर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि निदान पद्धतींमध्ये नवनवीन संशोधन होत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करून मृत्यूचे प्रमाण अत्यल्प करण्याच्या दिशेने प्रयत्न होणे आवश्यक आहे. अचूक निदान, रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि आधुनिक औषधांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावता येईल. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी नवोन्मेष हाच महत्वाचा मार्ग आहे.

महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे आगमन होत असून, ॲस्ट्राझेनेकाने या विद्यापीठांसह तसेच राज्यातील नामांकित संशोधन संस्थांसोबत सहकार्य करावे. अशा सहकार्यामुळे संशोधनाला संस्थात्मक स्वरूप मिळेल आणि नवोन्मेष क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांच्या प्रतिभेचा उपयोग करता येईल. मुंबईतील मुख्यालयाच्या माध्यमातून कंपनीने संशोधन, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवेच्या विविध क्षेत्रांत विस्तार करावा. उद्योगांची वाढ ही राज्याच्या विकासाशी जोडलेली असल्याने महाराष्ट्र शासन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी सदैव सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांनी प्रास्ताविकात कंपनीच्या मुंबईतील मुख्यालयामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, भारताच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेशी आणि महाराष्ट्राच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या दृष्टिकोनाशी कंपनीचे उद्दिष्ट सुसंगत असून भारताला नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी औषधनिर्मिती आणि जैवऔषध क्षेत्रात संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे.

ॲस्ट्राझेनेका ही जागतिक औषधनिर्मिती कंपनी असून, विज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये परिवर्तन घडविण्यासोबतच श्वसनविकार, जैवऔषधे आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांमध्येही कंपनी संशोधन करीत आहे. विज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याच्या भूमिकेतून कंपनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेशोत्सवात सोनसाखळी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश!
Next Article चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

November 2, 2026

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

November 2, 2026

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?