Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»रस्त्यावरील रेलींग व दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी मैलाशुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर
पिंपरी चिंचवड

रस्त्यावरील रेलींग व दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी मैलाशुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि इतर वाहनचालकांसाठी रस्त्यावरील संरक्षक व्यवस्था स्पष्टपणे दिसणे हा स्वच्छता करण्याचा मुख्य उद्देश

स्वच्छता केवळ सौंदर्यीकरणाचा भाग नसून रस्ते सुरक्षिततेशी संबंधित देखभाल दुरुस्तीचे महत्वपूर्ण कार्य

दि.१७ ऑक्टोबर २०२६ ;-  शहरातील रस्त्यावरील बीआरटी रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी मनपामार्फत मनपाच्या मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणेत येत आहे. सदर काम महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या टँकरमार्फत करणेत येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या शुद्ध पाण्याचा वापर यासाठी केला जात नाही.

स्वच्छतेचा उद्देश केवळ सुशोभीकरण नसून रस्ते सुरक्षितता नुकत्याच झालेल्या पावसाळ्यामुळे रस्त्यावरील चिखल, माती व धूळ बीआरटी रेलिंग आणि दुभाजकांवर साचलेली आहे. या थरामुळे रेलिंगचा रंग, दुभाजकांच्या कडा आणि त्यावरील परावर्तक पट्टे झाकले जाऊन ते वाहनचालकांना स्पष्टपणे दिसण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही स्वच्छता केवळ सौंदर्यीकरणाचा भाग नसून रस्ते सुरक्षिततेशी संबंधित देखभाल दुरुस्तीचे महत्वपूर्ण कार्य म्हणून करणेत येत आहे.

नुकतीच बीआरटी रेलिंगला स्कूल बसची धडक झाल्याची घटना घडलेली आहे. तथापि, अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर रेलिंग व दुभाजकांची दृश्यता कायम ठेवणे आणि संभाव्य धोकादायक ठिकाणांची स्वच्छता करणे या प्रतिबंधात्मक उपायांना महानगरपालिका महत्त्व देत आहे.

आगामी पुणे ग्रँड टूर-२०२७ सायकल स्पर्धेच्या तयारीसोबत नियमित देखभालीलाही प्राधान्य आगामी ‘पुणे ग्रँड टूर-२०२७’ सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने संबंधित बीआरटी मार्गांची स्वच्छता व देखभाल करणेत येत आहे. तथापि, रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता ही केवळ स्पर्धेपुरती किंवा शहराच्या सुशोभीकरणापुरती मर्यादित नाही. दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि इतर वाहनचालकांसाठी रस्त्यावरील संरक्षक व्यवस्था स्पष्टपणे दिसणे, हे देखील या कामाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

💮जलसंवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखून पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. त्याचवेळी सार्वजनिक रस्त्यांची आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेची कामेही करणे क्रमप्राप्त आहे. या दोन्ही बाबींचा विचार करून महानगरपालिका प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करीत आहे.💮

“नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता व रस्ते सुरक्षिततेच्या कामांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे”

—-बापुसाहेब गायकवाड,सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड 

 

   “पिंपरी -चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी,नागरिक,स्वयंसेवी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था या पाणीटंचाई व त्यावरील आवश्यक उपाययोजना करणेकामी उत्तम सहकार्य करत आहेत, या मोहिमेत पाणी बचत तसेच पाण्याचा पुनर्वापर यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना महापालिका सन्मानित करणार आहे”

……..डॉ.विजय सुर्यवंशी,आयुक्त, पिंपरी चिंचवड 

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतळवडेत वृद्ध महिलेचे हातपाय बांधून ७३ तोळे सोन्याची लूट; तिघांना आठ तासांत अटक!
Next Article देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?