Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर दुसऱ्यांदा मकोका!
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर दुसऱ्यांदा मकोका!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे ज्येष्ठ नागरिकाला ८६ लाखांचा गंडा; सहा आरोपी अटकेत

कंबोडियातील मुख्य आरोपीशी संपर्क; २८ लाख रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा

पिंपरी, दि. १६ ऑक्टोबर : बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संघटित सायबर गुन्हेगारी टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सन २०२६ मधील सायबर गुन्हेगारांविरोधातील ही दुसरी मकोका कारवाई असून, या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीच्या रकमेपैकी गोठवलेले २८ लाख रुपये तक्रारदाराला परत मिळण्यासाठी न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात १७ जुलै २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केली. फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. तपासादरम्यान या खात्यांतील काही रक्कम गोठविण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी तेजस ज्ञानोबा लोखंडे (२४), अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (२८), हर्षल दिलीप बोरा (३४), सोनू हरिष शर्मा (२१), अ‍ॅलेक ऊर्फ गौरव रमेश गाडगे (२४) आणि आखील श्रीनिवासराव नेल्लुरी (२४) या सहा आरोपींना अटक केली. पुणे, लातूर, अहिल्यानगर, नवी मुंबई आणि हैदराबाद येथे तपास करून ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

अटक केलेले आरोपी कंबोडियातील मुख्य आरोपीच्या संपर्कात राहून सायबर गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना गुंतवणुकीचे आमिष दाखविले. फसवणुकीतून मिळालेली रक्कम यूएसडीटीसारख्या आभासी चलनात वर्ग करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या टोळीशी संबंधित आरोपींनी पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरातमध्ये फसवणूक, अपहरण, खंडणी, दरोडा, अमली पदार्थांची तस्करी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासारखे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. संघटितपणे सायबर फसवणूक करून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या कलम ३(१)(ii) आणि ३(४) चा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअखेर निर्णय झाला!
Next Article वायसीएम रुग्णालय की मद्यालय? कथित मद्यपान पार्टीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी… मारुती भापकर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?