Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोशीतील ३० वर्षीय महिलेच्या खुनाचा २४ तासांत उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी केले अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोशीतील ३० वर्षीय महिलेच्या खुनाचा २४ तासांत उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी केले अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केल्याचा आरोप; एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांची कामगिरी

मोशीतील मंत्रा मोमेंट्स सोसायटी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लावला छडा

भोसरी एमआयडीसी : मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरातील मंत्रा मोमेंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक गाळ्याजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेल्या खून प्रकरणाचा एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला. या प्रकरणी मृत महिलेचा पती आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने साथीदारांच्या मदतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील मंत्रा मोमेंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील कमर्शियल ऑफिस गाळा क्रमांक ७ समोर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या मानेवर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच तिची ओळख पटू नये, यासाठी चेहरा विद्रूप करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते.

या प्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाचे कारण आणि आरोपींबाबत सुरुवातीला कोणताही ठोस सुगावा मिळत नसल्याने पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिलेचे नाव प्रियंका आकाश कांबळे (वय ३०, रा. मोरे वस्ती, टॉवर लाइन, चिखली, पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलिसांनी  १)आकाश ऊर्फ घाऱ्या रमेश कांबळे (वय २८), रा. स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, बोऱ्हाडेवाडी, मोशी,२) प्रथम बालाजी कांबळे (वय २२), रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी. ३) रोहित दिनेश शिंदे (वय १९),४) दिनेश मधुकर वाघमारे (वय १९), दोघेही रा. स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, बोऱ्हाडेवाडी, मोशी. यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक आकाश ऊर्फ घाऱ्या कांबळे हा मृत प्रियंका हिचा पती आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने तिची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता त्यांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना दि. १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले यांच्यासह पोलीस अंमलदार प्रशांत सोरटे, संजय जरे, चंद्रकांत गवारी, गणेश बोऱ्हाडे, स्वप्नील शेलार, राहुल लोखंडे, सुनील चौधरी, बाजीराव सानप, नितीन खेसे, भागवत शेप, गजानन आढे, आशिष गोपी, स्वप्नील झनकर, पवन कोंडेदेशमुख, प्रवीण मुळुक आणि अमोल दातार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलीस फौजदार राजू जाधव आणि पोलीस अंमलदार अरुणा खंदारे यांनी तांत्रिक विश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावली.या खून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ करीत आहेत.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीसह तिघांना अटक
Next Article अखेर निर्णय झाला!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?