Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»बैलपोळा म्हणजे बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण! – प्रगतिशील शेतकरी पै. नरेश जगताप
पुणे

बैलपोळा म्हणजे बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण! – प्रगतिशील शेतकरी पै. नरेश जगताप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपळे गुरव : वर्षभर शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांच्या शेतीकामात मोलाची मदत करणाऱ्या बैलांप्रति आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा. या दिवशी बैलांना अंघोळ घालून, त्यांच्या शिंगांना रंग लावून, बाशिंग बांधून आणि अंगावर रंगीबेरंगी झुली घालून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. तसेच त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, अशी भावना पिंपळे गुरव येथील प्रगतिशील शेतकरी पै. नरेश जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी नरेश जगताप म्हणाले की, “आमच्या बैलजोडीला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मान मिळाला आहे. हे आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. मात्र, आज शहरांमध्ये वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशुधन पाळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. जनावरांना सांभाळण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध होत नाही.

“आम्ही आज जे काही आहोत, त्यामध्ये बैलांचे मोठे योगदान आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही वर्षभर त्यांच्याकडून कोणतेही काम न घेता केवळ हौसेने त्यांचा सांभाळ करतो. घरातील महिला आणि मुलेही बैलांची काळजी घेतात. आमची नातवंडे स्वतः बैलांना धरतात. त्यामुळे बैल आणि आमच्या कुटुंबातील सदस्य यांच्यात घट्ट भावनिक नाते निर्माण झाले आहे. या जिव्हाळ्यामुळेच त्यांना विकण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. मात्र, शहरातील जागेची कमतरता आणि इतर अडचणींमुळे त्यांचा सांभाळ करणे कठीण होत असल्याची खंत आहे,” 

                       ……पै.नरेश जगताप.

बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांप्रति असलेले प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना जगताप कुटुंबीयांनी जपली आहे. परंपरा, शेतीसंस्कृती आणि पशुधनाशी असलेले भावनिक नाते आजही टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यावेळी नरेश जगताप, सौरभ जगताप, कुनाल जगताप, गौरव जगताप, ओंमकार जगताप, सुमित जगताप, दत्ता जगताप, श्वेता जगताप, वृशाली जगताप यांच्यासह जगताप कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोकभवन येथे पोलीस पदक अलंकरण समारोह
Next Article कारमधून ५० लाखांची रोकड लंपास; दोन आरोपी ८ तासांत जेरबंद!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

२०३० पर्यंत पुणे देशाचे ‘मोबिलिटी हब’ बनणार!

November 4, 2026

पीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!

November 1, 2026

बेकायदा बाईक टॅक्सी कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; सेवा बंद करा!

October 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?