Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तळेगाव-मावळ परिसरात होती दहशत; १३ गंभीर गुन्हे दाखल

पिंपरी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखा, युनिट-४च्या पथकाने जांभुळगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले. नारायण सोपान दाभाडे (वय ४१, रा. जांभुळगाव, व्हिजन सिटी, फ्लॅट नं. ३०४, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९६/२०२३ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गंभीर गुन्ह्यात तो गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना हवा होता.

नारायण दाभाडे याच्यावर यापूर्वी मोक्का, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी, अपहरण, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्स लुटण्याचा कट, दरोड्याचा प्रयत्न आणि गांजा विक्री यांसारखे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात त्याची दहशत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला. तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे जांभुळगाव येथे सापळा रचून आरोपी नारायण दाभाडे याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार असवले, पोलीस हवालदार सोनटक्के आणि पोलीस शिपाई मुंडे यांच्या पथकाने केली.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
Next Article “दगडाने डोक्यात वार करून खून; २४ तासांत दोघे आरोपी आणि तीन बालक पोलिसांच्या ताब्यात”
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!

November 2, 2026

पैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक

October 25, 2026

वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 25, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, फसवणूक आणि वाहन अपघातांचे गुन्हे दाखल

October 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?