Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 8, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गोव्यात वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजाचा ‘नाना’ काळाच्या पडद्याआड

गोवा, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : आपल्या चतुरस्त्र अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि भारदस्त आवाजाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज गोव्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वासह देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील डोना पौला येथील निवासस्थानी नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे सातत्याने CPRचे प्रयत्न केले; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नाना पाटेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविधांगी आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारत भारतीय चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयातील आक्रमकता, संवेदनशीलता आणि संवादफेकीची खास शैली यामुळे ते रसिकांच्या मनात कायमचे घर करून राहिले.

अभिनयाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही नाना पाटेकर यांची स्वतंत्र ओळख होती. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक कार्य करण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी होती.

नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभाजपाच्या ‘सेवा ज्योती यात्रे’तून विकसित भारताचा संकल्प
Next Article चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महाराष्ट्र सदनात आज ‘सूर दीपावली’ संगीत सोहळ्याचे आयोजन

November 2, 2026

महाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

राष्ट्रीय प्रेस मीडिया संमेलनात पिंपरी चिंचवडच्या पत्रकारांना मिळाला बहुमान

September 13, 2026

सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी

September 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?