Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भाजपाच्या ‘सेवा ज्योती यात्रे’तून विकसित भारताचा संकल्प
पिंपरी चिंचवड

भाजपाच्या ‘सेवा ज्योती यात्रे’तून विकसित भारताचा संकल्प

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भोसरीत ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’;शहर भाजपा-पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शन

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी….भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ भोसरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राष्ट्रविकास, जनसेवा आणि संघटनबळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘विकसित भारत’ संकल्पनेचा जयघोष केला.

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या संकल्प सभा व यात्रेला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सेवा, सुशासन आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासाभिमुख योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासह राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटन अधिक सक्षम करण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला जनसहभाग आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय योगदानाची जोड देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, गटनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटनी, वैशाली खाड्ये, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी राजेश पिल्ले यांच्यासह सर्व मंडलाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त सहभागामुळे भोसरी परिसरात भाजपाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडले. ‘संकल्प विकासाचा, ज्योत सेवेची आणि ध्यास विकसित भारताचा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेली ही यात्रा आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरली.

“‘विकसित भारत’ ही केवळ संकल्पना न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नागरिकाची आहे. सेवा, सुशासन आणि विकासाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला पाहिजे. ‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जनसहभागाची जोड देत विकासाच्या प्रवाहात प्रत्येक घटकाला सहभागी करून घेण्याचा निर्धार आपण करूया. संघटनेची ताकद ही कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे आणि हीच एकजूट राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला अधिक बळ देईल.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपु. ल. कट्ट्यावर रंगणार शं.ना.नवरे यांच्या कथांचे अभिवाचन
Next Article नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?