भोसरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दगडाने डोक्यात वार करून अतुल रघतवान यांचा खून
पिंपरी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडाने डोक्यात वार करून करण्यात आलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालकांना भोसरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले. घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
भोसरी येथील देवकरवस्ती परिसरात प्रोटॅक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ ते ३.३५ वाजण्याच्या दरम्यान अतुल तानाजी रघतवान यांच्यावर दगडाने डोक्यात वार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयताचे आतेभाऊ करण ऊर्फ गणेश तानाजी करवंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १४०(१), १८९(२), १९०, १९१(१), १९१(३), ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, उपलब्ध तांत्रिक पुरावे तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
या तपासादरम्यान सत्कारसिंग सतनामसिंग भोंड (वय ३६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), पवन धनंजय गुप्ता (वय १८ वर्षे ५ महिने, रा. देवकरवस्ती, भोसरी) तसेच तीन विधीसंघर्षित बालकांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे खून प्रकरणासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबत सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारूती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ टापरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे, सपोफौ बोयणे, पोलीस हवालदार बांबळे, डामसे, मोरे, माने, पोलीस शिपाई खाडे, गारूडकर, वाटकर, ढेरे, ताटे तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ-३ येथील तांत्रिक विश्लेषण पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांचा सहभाग होता.
