गुन्हे शाखा युनिट-४ची उल्लेखनीय कामगिरी; पाच संशयित ताब्यात
पिंपरी-चिंचवड : गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करत गुन्हे शाखा युनिट-४ने दोन घरफोडी आणि दोन वाहनचोरी असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन डिलक्स मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाला काही व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळून आल्या. पोलिसांनी रुषीकेश राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे), अशोक राजेंद्र भोसले (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून एमएच १३ सीए ८६२८ आणि एमएच १४ बीडब्ल्यू ३९२७ या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात वाहन चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले.
उत्तर चाकण पोलीस ठाणे – गु.र.क्र. ९३०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२).उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे – गु.र.क्र. १३१/२०२६, भारतीय न्याय संहिता ३०३(२).चिखली पोलीस ठाणे – गु.र.क्र. २३९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ).चिखली पोलीस ठाणे – गु.र.क्र. ३८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४).अशा प्रकारे पोलिसांनी तपासात गुन्हे उघडकीस आणले आहेत.
यातील आरोपी क्रमांक एक व अन्य दोन आरोपींना पुढील कारवाईसाठी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात, तर आरोपी क्रमांक दोन व अन्य एका आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले तसेच सपोफौ लोणकर, पो.हवा मोरे, महाडीक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, पो.शि मेरगळ, वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, नागरे, सोनवणे, बाळसराफ, खराडे आणि माटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
