Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर  : राज्यातील अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन ६ ऑगस्ट २०२६ रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायको ट्रॉपिक सब स्टान्सेस ॲक्ट अंतर्गत पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना पुढाकार घेतला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर करण्याचे तसेच या प्रस्तावाचा वैयक्तिक स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते.अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी महाराष्ट्रात विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देश दिले होते.

या महत्त्वाच्या विषयावर कार्यवाहीला गती देण्यासाठी विशेष न्यायालयाच्या स्थापनेसंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, तो केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सादर करावा आणि प्रस्ताव मंजुरीसाठी आवश्यक तो पाठपुरावा वैयक्तिक स्तरावर सुनिश्चित करावा, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.

विशेष न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रशासकीय, कायदेशीर आणि संस्थात्मक बाबींचा सविस्तर समावेश प्रकल्प अहवालात अपेक्षित आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाशी समन्वय साधून प्रस्तावाला पुढे नेत या विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची प्रकरणे संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची असतात. अशा प्रकरणांची सुनावणी प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने झाल्यास न्यायप्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होईल. प्रस्तावित विशेष न्यायालयामुळे प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करणे, पुरावे आणि साक्षीदारांशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे तसेच दोषींविरुद्ध प्रभावी न्यायालयीन कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.

युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुरक्षित ठेवणे, अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला प्रतिबंध करणे आणि अशा गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध जलद व प्रभावी कारवाई सुनिश्चित करणे, या व्यापक उद्देशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. विशेष न्यायालयाच्या स्थापनेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश हे त्याच प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे.

विशेष न्यायालयाची स्थापना झाल्यामुळे अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांविरोधातील राज्याच्या लढ्याला अधिक बळ मिळणार आहे. तसेच तपास यंत्रणा, अभियोजन यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होऊन नागरिकांना वेगवान न्याय मिळण्यास मदत होईल. राज्यातील अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपोलिसांनी केले दोन घरफोड्या, दोन वाहनचोरीचे गुन्हे उघड
Next Article पु. ल. कट्ट्यावर रंगणार शं.ना.नवरे यांच्या कथांचे अभिवाचन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

November 2, 2026

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

November 2, 2026

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?