Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाच वाहने, स्पेअरपार्टसह २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : मोटारसायकलींची चोरी करून त्यांचे स्पेअरपार्ट वेगवेगळे करून भंगार दुकानदारांना विक्री करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पाच मोटारसायकली व विविध वाहनांचे स्पेअरपार्ट असा एकूण २ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० ते ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान बाणेर येथील रोहन लेअर सोसायटी परिसरातून फिर्यादीची यामाहा एमटी-१५ (एमएच-१३-ईडब्ल्यू-५८४७) मोटारसायकल चोरीस गेली होती. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. पथकातील पोलिसांनी तब्बल ९० ते १०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चोरीच्या मोटारसायकलींचा माग काढला. तपासादरम्यान चोरटे मोटारसायकल घेऊन इंगवले चौक, पिंपळे निलख येथे गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांनी इंगवले चौक परिसरात शोध घेतला असता हॉटेल जगदंबाच्या मागे ऋषीकेश शहाजी साठे याचे फॅब्रिकेशनचे दुकान असल्याचे आढळले. या दुकानात चोरीच्या मोटारसायकलींचे वेगवेगळे स्पेअरपार्ट करून ते भंगार दुकानदारांना विक्री केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी दुकानातून पाच मोटारसायकली तसेच विविध मोटारसायकलींचे स्पेअरपार्ट जप्त केले.

या प्रकरणात पवन मरीआप्पा भज्जी (वय २५, रा. औंध, पुणे), ऋषीकेश शहाजी साठे (वय २९, रा. पिंपळे निलख, पुणे) यांच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी ऋषीकेश साठे याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार फारुक मुल्ला करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित
Next Article शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : येरवडा येथील शासकीय प्रादेशिक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुधवार,…

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

राष्ट्र आणि धर्म परस्परावलंबी; भारताच्या ज्ञानपरंपरेत जगाच्या आव्हानांवर मार्ग

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?