Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»पुरंदर तहसील कार्यालयातील २५ हजारांची लाच घेताना क्लार्क रंगेहाथ
पुणे ग्रामीण

पुरंदर तहसील कार्यालयातील २५ हजारांची लाच घेताना क्लार्क रंगेहाथ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे/सासवड प्रतिनिधी…पुरंदर तहसील कार्यालयातील वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणातील आदेश लवकर मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सासवड येथे करण्यात आली.

तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या गट क्रमांक ७६९ मधील असमान हिस्साच्या सुनावणीचे प्रकरण पुरंदर तहसीलदारांच्या न्यायालयात सुरू होते. २४ जून रोजी तहसीलदारांनी वादी व प्रतिवादींना समान संधी देऊन प्रकरण बंद केले होते. मात्र, संबंधित आदेश अद्याप प्राप्त झाला नव्हता.

आदेशाबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार २९ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात गेले असता त्यांची भेट क्लार्क विजय खळदकर याच्याशी झाली. प्रकरण तहसीलदारांसमोर ठेवण्यासाठी सुरुवातीला ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, सुनावणीचा आदेश तहसीलदारांकडून प्राप्त करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे एसीबी पथकाने सापळा रचला. सासवड येथील तहसीलदार कार्यालयासमोरील रोहित हॉटेलजवळ पंचांसमक्ष २५ हजार रुपये स्वीकारताना खळदकर याला पकडण्यात आले.

कारवाईनंतर हा शासकीय कर्मचारी नसून खासगी इसम असल्याचे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याला २ सप्टेंबर रोजी दुपारी २.०१ वाजता ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७(अ) अन्वये सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार बाळासाहेब गदादे, दीपक काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी दिवेकर यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक-१ अजित पाटील यांचे या कारवाईस मार्गदर्शन लाभले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसांगवी महापालिका कार्यालयातील करसंकलन विभागात ACBची धाड; लिपिक रंगेहात जाळ्यात
Next Article ‘व्यक्ती एक, कला अनेक’; ज्येष्ठ कलावंत मास्तर कोंडीराम आवळे यांचा कलाप्रवास प्रेरणादायी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दिवे गावचा महाराष्ट्रात डंका; साक्षी टिळेकर बी.फार्मसीत राज्यात प्रथम

August 22, 2026

जुन्नर हादरले! १० वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; घराशेजारील २५ वर्षीय तरुण ताब्यात

August 19, 2026

शिरूरमध्ये २२ लाखांचा एम.डी. जप्त; दोघांना अटक

August 19, 2026

संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामठवाडीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?