Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»सातारा»‘व्यक्ती एक, कला अनेक’; ज्येष्ठ कलावंत मास्तर कोंडीराम आवळे यांचा कलाप्रवास प्रेरणादायी
सातारा

‘व्यक्ती एक, कला अनेक’; ज्येष्ठ कलावंत मास्तर कोंडीराम आवळे यांचा कलाप्रवास प्रेरणादायी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जाम (ता. वाई, जि. सातारा) | दि.०४ सप्टेंबर २०२६….महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे ज्येष्ठ कलावंत मास्तर कोंडीराम आवळे यांचा जीवनप्रवास म्हणजे ‘व्यक्ती एक, कला अनेक’ याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाम गावात ग्रामस्थ, कलाप्रेमी, तमाशा क्षेत्रातील कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

मुक्काम पोस्ट जाम, ता. वाई, जि. सातारा येथे जन्मलेल्या आवळे मास्तरांनी १९६७ मध्ये बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही काळ एस.टी. सेवेत कंट्रोलर म्हणून काम केले; मात्र मन रमले नाही. अखेर त्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्ध परंपरा असलेल्या तमाशा क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अत्यल्प मानधनात त्यांनी तमाशामध्ये कामाला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील विविध तमाशा कंपन्यांमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटविला.

मात्र, कैलासवासी कांताबाई सातारकर आणि मास्टर रघुवीर खेडकर यांच्या तमाशा कंपनीत त्यांनी दीर्घकाळ काम केले. रघुवीर खेडकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी वगनाट्य लेखनाबरोबरच विविध वगनाट्यांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. नाथा मास्तर घोडेगावकर यांनी लिहिलेल्या अनेक वगनाट्यांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

त्यांच्या या प्रदीर्घ कलासेवेची दखल घेत बेल्हे तमाशा महोत्सवात स्वर्गीय दत्ता महाडिक जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. याच सोहळ्यात त्यांची भेट तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत यांच्याशी झाली. रंगमंचावर अनेक भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान मिळविले असले, तरी पडद्यावर एक चांगली भूमिका करण्याची आपली इच्छा असल्याचे आवळे मास्तरांनी राऊत यांच्याकडे व्यक्त केले.

राऊत यांनी त्यांची इच्छा तत्काळ मान्य करत त्यांना आपल्या ‘यातना’ या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. आवळे मास्तरांनी या भूमिकेला आपल्या अभिनयाच्या ताकदीने अक्षरशः जिवंत केले. आजही तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवर ‘यातना’ हा चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयाची ताकद अनुभवता येते. या चित्रपटात निर्माते रामदास राऊत यांच्यासह अभिनेत्री अलकाताई जोगदंड यांनीही भूमिका साकारली आहे.

भूमिका कोणतीही असो, तिच्यात स्वतःला झोकून देण्याची विलक्षण क्षमता आवळे मास्तरांमध्ये आहे. अभिनयाचे वेगळे प्रशिक्षण किंवा मोठी तयारी न करता अंगभूत कलागुणांच्या जोरावर भूमिका प्रभावीपणे साकारता येते, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळेच कलाक्षेत्रात त्यांना ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत, ‘नटसम्राट’ म्हणून आदराने ओळखले जाते.

वाढदिवसानिमित्त बेल्हे तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव अण्णा जगताप, खंदारे सर, मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, तमाशा अभ्यासक डॉ. संपतराव पार्लेकर, पापभाई बोरगावकर, संजय विश्वासराव, कलाप्रेमी उद्योजक संजय चव्हाण सर यांच्यासह इंदुरीकर तमाशा व नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आवळे मास्तरांना शुभेच्छा दिल्या. त्यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदी लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

जाम येथील ग्रामस्थांनी आवळे मास्तरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आवळे मास्तरांनी आपल्या कलाप्रवासातील आठवणींना उजाळा दिला.

“कलाकार म्हणून माझी हयात तमाशा क्षेत्रात गेली. अनेक तमाशा मालक भेटले, त्यांच्यासोबत काम केले; मात्र स्वर्गीय कांताबाई सातारकर आणि मास्टर पद्मभूषण रघुवीर खेडकर यांनी मला जे प्रेम आणि माया दिली, ती मी कधीही विसरू शकत नाही,” असे सांगताना आवळे मास्तर भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि ग्रामस्थांनी त्यांना आधार देत शांत केले.

जाम गावचे सरपंच तथा प्रथम नागरिक यांनीही आवळे मास्तरांच्या कलासेवेचा गौरव करत, “असा महान कलाकार पुन्हा होणे नाही,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याला सलाम केला. शुभेच्छा आणि सदिच्छांनी भारलेल्या या सोहळ्याची सांगता चहापानाने झाली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुरंदर तहसील कार्यालयातील २५ हजारांची लाच घेताना क्लार्क रंगेहाथ
Next Article गणेशोत्सवासाठी प्रशासन ‘अलर्ट’; सिंधुदुर्गात सुविधांचा तुटवडा होऊ नये!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भोसरीच्या वस्तादाचा वाईच्या मातीत गौरव

September 7, 2026

फलटणमध्ये फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा; रझिया शेख यांच्याकडे तालुका महिला नेतृत्वाची धुरा

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?