फलटण,प्रतिनिधी दत्तात्रय घुले..: फलटण येथील लक्ष्मीनगर परिसरातील फलटण तालुका ग्राम विकास अधिकारी भवन येथे सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फाउंडेशनची माहिती व प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. यावेळी फाउंडेशनची उद्दिष्टे, कार्यपद्धती, सामाजिक उपक्रम आणि आगामी नियोजनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा जिल्हाध्यक्ष श्री. सचिन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात फाउंडेशनचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा झाली. तसेच तालुका महिला अध्यक्ष, विभाग प्रमुख आणि केंद्रप्रमुख यांच्या निवडीबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर मनोज कुमार डांगे यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सैनिक, शेतकरी, महिला तसेच समाजातील विविध घटकांसाठी फाउंडेशनच्या माध्यमातून व्यापक सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
रझिया शेख यांची तालुका महिला अध्यक्षपदी निवड
कार्यक्रमात सौ. रझिया शेख यांची सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या फलटण तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे सामाजिक कार्य, नेतृत्वगुण, कार्यकुशलता आणि महिलांसाठी काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
नवनिर्वाचित तालुका महिला अध्यक्षा सौ. रझिया शेख यांनी फाउंडेशनचे फलटण तालुक्यात स्वागत करत, तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत फाउंडेशनचे कार्य पोहोचविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सैनिक, शेतकरी, महिला आणि समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. निलेशजी निकम, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. सचिन साबळे, सौ. श्वेता सावळे, श्री. मारुती मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. फलटण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. गणेश दडस, उपाध्यक्ष श्री. अंगराज जाधव, सचिव श्री. गजानन रणवरे यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते.
कार्यक्रमास सौ. सुकेशनी कांबळे, सौ. सुमन पवार, प्राचार्य शाहीन शेख, सना, श्री कैफ शेख, श्री. मारुती टकले यांच्यासह महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रशिक्षण शिबिरासाठी ग्राम विकास अधिकारी भवन मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामसेवक संघटनेचे विशेष आभार मानण्यात आले. फलटण तालुक्यात फाउंडेशनचे कार्य व्यापक स्वरूपात वाढवून सर्वांना सोबत घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.