Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार
पिंपरी चिंचवड

पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पत्रकारांना हेल्मेटचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार.

सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याचा मला आनंद आहे-महापौर रवि लांडगे

पिंपरी : रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी आणि पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी ने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, नगरसेवक विकास साने, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ,रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर,सचिव डॉ अमित त्रिपाठी, मा.अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे,रो.संतोष मोरे,रो.दीपक सोनवणे, प्रशासकीय संचालक केशव काळदाते, खजिनदार सुनील पाटील पाटील,रो.अविनाश तळवले, रो.स्वप्नील भालेराव, तसेच पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. दीपक सोनवणे यांनी केले. पत्रकार हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, विविध घटना आणि नागरिकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत असतात, असे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी काहीतरी मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ज्ञानेश्वर विधाटे यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. समाजोपयोगी उपक्रम राबविणे ही रोटरीची परंपरा असून,पत्रकार बांधवांसाठी यापुढेही आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

माजी अध्यक्ष संतोष मोरे म्हणाले की, रोटरी क्लबचे सदस्य स्वतःच्या खर्चातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. समाजाच्या हितासाठी आणि गरजू घटकांसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यास रोटरी क्लब सदैव तत्पर राहील.

पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाचे नूतन अध्यक्ष रोहित खर्गे यांनी पत्रकार संघ आणि पत्रकार महासंघ हे पत्रकारांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणारे घटक असल्याचे सांगितले. मुख्य आधारस्तंभ अरुण उर्फ नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी दोन्ही संघटना एकजुटीने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक विकास साने म्हणाले पत्रकार कायमच सत्यासाठी लढत असतात. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार हे विश्वासाचे माध्यम वाटते. अशा महत्त्वाच्या सामाजिक घटकाच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लबने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. पत्रकारांना हेल्मेटबरोबरच विमा संरक्षण मिळावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार महासंघाच्या महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे, महासंघांचे कार्याध्यक्ष दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, अशोक कोकणे, अविनाश कांबीकर, विवेक कुलकर्णी, गणेश मोरे, भीमराव बरकडे, संतोष जाधव, प्रवीण कांबळे, माधुरी कोराड, लीना माने, श्रद्धा कोतावडेकर, श्रद्धा प्रभुणे, शेहनाज कुरणे, श्रीधर जगताप, कालिंदर शेख, शफिक शेख,भीमराव तुरुकमारे, नागेश खजुर्गीकर, सीताराम मोरे, देवा भालके,दिलीप देहाडे, प्रदीप सपकाळ, राम बनसोडे, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले तर आभार प्रवीण शिर्के यांनी मानले पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थित पत्रकारांनी स्वागत केले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअभियंते हे राष्ट्रनिर्माणाचे शिल्पकार – डॉ. प्रमोद पाटील
Next Article फलटणमध्ये फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा; रझिया शेख यांच्याकडे तालुका महिला नेतृत्वाची धुरा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?