Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»अभियंते हे राष्ट्रनिर्माणाचे शिल्पकार – डॉ. प्रमोद पाटील
पुणे

अभियंते हे राष्ट्रनिर्माणाचे शिल्पकार – डॉ. प्रमोद पाटील

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
पीसीसीओईआर मध्ये आशियाई परिषद प्रथम सत्र संपन्न 

पिंपरी, पुणे (दि. ३ सप्टेंबर २०२६)…. एआय या प्रगत तंत्रज्ञानाकडे मर्यादित कल्पना असतात, परंतु आपण स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर विश्वास ठेवून काम केले तर ते ‘आउट ऑफ द बॉक्स’ म्हणजेच नाविन्यपूर्ण ठरू शकते. आपल्या मेंदूला ज्या कल्पना सुचू शकतात त्या एआय ला शक्य नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, उद्याचे अभियंते हेच खरे राष्ट्र निर्माणाचे शिल्पकार आहेत असे कोल्हापूर येथील डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे संशोधन संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च च्या वतीने आयईईई महाराष्ट्र सेक्शन च्या सहकार्याने “एशियन कॉन्फरन्स ऑन इनोवेशन इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी (एएसआयएसीओएनएफ) २०२६” या ६ व्या आशियाई परिषदेचे उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रमोद पाटील बोलत होते.

यावेळी मुंबईतील ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे डॉ. शशिकांत पाटील, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे संचालक डॉ. केतन कोटेच्या, पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी आणि उद्योजक जयश जगताप, महाराष्ट्र सेक्शन वाईस चेअर डॉक्टर सौरभ सोनी, डॉ. प्रमोद बिडे, व्हॉइस चेअर इंडिया कौन्सिल डॉ. चाणक्य झा, समन्वयक डॉ. राहुल मापारी, पीसीसीओईआरचे इ अँड टीसी विभाग प्रमुख डॉ. किरण नाप्ते, डॉ. विजय लक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आज एआयचा वापर ५ टक्के होत आहे आणि ९५ टक्के क्षेत्र अजूनही प्रतीक्षेत आहे. यासाठी योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे. केवळ ऊर्जा निर्माण करणे पुरेसे नाही, तर ती कशी निर्माण केली जाते हे महत्त्वाचे आहे. एआय हवामानाचा अंदाज आणि शाश्वततेचे गणित मांडत आहे. विषारी वायूंसारखे हानिकारक शोध लावू नयेत. धोक्याची पूर्वसूचना देणारी उपकरणे महत्त्वाची आहेत. यासाठी केवळ एआय वर अवलंबून राहणे पुरेसे नाही. आपल्या फोनमध्ये ८० प्रकारची खनिजे असतात. ई-कचरा, पुनर्वापर आणि अपसायकलिंग यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. एआय द्वारे तयार केलेले ७० टक्के प्रकल्प नाकारले जातात, त्यामुळे आधी स्वतःहून काम करणे महत्त्वाचे आहे असेही कोल्हापूर येथील डीवाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे संशोधन संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआर चे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, संशोधनाच्या क्षेत्रात ‘एआय’चा वापर करणे म्हणजे ती ‘नवनिर्मिती’ असावी. समस्या सोडवून उपयुक्त उत्तर शोधणे, म्हणजेच ‘नवनिर्मिती’ होय.

डॉ. केतन कोटेजा यांनी सांगितले की, ‘न्यूरो-सिम्बॉलिक एआय’ द्वारे आपण समाजाला फायदा मिळवून देऊ शकतो. यात सीएनएन, न्यूरो एआय आणि सिम्बॉलिक एआय यांचा समावेश होतो. एआय मधील ९९ टक्के समस्या ‘कोझल एआय म्हणजे कार्यकारणभाव आधारित एआय द्वारे सोडवल्या जात आहेत.

शशिकांत पाटील यांनी सांगितले की, आयईईई ही जगभरातील एक व्यावसायिक संस्था आहे. विद्यार्थ्यांसह यात ५ लाख सदस्य आहेत. शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, समाज विकास यात आयईईई संस्था काम करते.

डॉ. दिनेश अमळनेरकर यांनी सांगितले की, एका स्मार्टफोनवर १२ पेक्षा जास्त लोकांनी संशोधन कार्य केलेले आहे. आपणही एक प्रभावी प्रणाली विकसित करू शकतो.

जयेश जगताप यांनी सांगितले की, अन्न, वस्त्र आणि निवारा आवश्यक आहे. निवारा आणि वस्त्रांना पर्याय आहेत, पण अन्नाला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात एआय सुद्धा पर्याय नाही. गरजेपोटी नवीन पिढी इतर पर्याय शोधण्याऐवजी एआय वापरते.स्वागत डॉ. राहुल मापारी, प्रास्ताविक चाणक्य झा आणि सूत्र संचालन डॉ. विजया यदुवंशी तर आभार किरण नाप्ते यांनी मानले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्टार बाजारमध्ये महागड्या खाद्यवस्तूंची चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद
Next Article पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?