Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरीगावात उद्या रंगणार भव्य दहीहंडीचा थरार!
पिंपरी चिंचवड

पिंपरीगावात उद्या रंगणार भव्य दहीहंडीचा थरार!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राशी खन्ना, महिमा मकवाना, नेहा सोनवणे, रुचिता जामदार यांची विशेष उपस्थिती; तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची बक्षिसे

पिंपरी | प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहाला आणखी रंगत आणण्यासाठी पिंपरीगाव येथे शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांची उपस्थिती आणि राज्यभरातून सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांमुळे यंदाचा दहीहंडी उत्सव विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

आयोजक तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या पुढाकाराने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून अभिनेत्री राशी खन्ना (फेम – ‘योध्दा’), महिमा मकवाना (फेम – ‘मुसाफिर कॅफे’), नेहा सोनवणे (फेम – ‘रौंदळ’) आणि रुचिता जामदार (फेम – ‘बिग बॉस मराठी सीझन ६’) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची बक्षिसे

यंदाच्या दहीहंडी स्पर्धेसाठी आयोजकांकडून तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गोविंदा पथकांमध्ये स्पर्धेची उत्सुकता निर्माण झाली आहे. थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणारा थरार नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

उत्सवाच्या निमित्ताने पिंपरीगाव परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार, कलाकारांची उपस्थिती, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे दहीहंडी उत्सवाला मोठी रंगत येणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास पिंपरी परिसरासह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी केले आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleफलटणमध्ये फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा; रझिया शेख यांच्याकडे तालुका महिला नेतृत्वाची धुरा
Next Article सांगवी महापालिका कार्यालयातील करसंकलन विभागात ACBची धाड; लिपिक रंगेहात जाळ्यात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?