Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»बनावट व्हॉट्सॲप अकाऊंटद्वारे कंपनीची २.२० कोटींची फसवणूक; राजस्थानातील दोघांसह तिघांना अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

बनावट व्हॉट्सॲप अकाऊंटद्वारे कंपनीची २.२० कोटींची फसवणूक; राजस्थानातील दोघांसह तिघांना अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : नामांकित ऑटो शोरूम कंपनीच्या मालकाचे नाव व छायाचित्र वापरून बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करत कंपनीच्या अकाऊंट एक्झिक्युटिव्हचा विश्वास संपादन करून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यातील दोघे मूळचे राजस्थानातील जोधपूरचे आहेत.

फिर्यादी यांच्या कंपनीतील अकाऊंट एक्झिक्युटिव्हला १४ ऑगस्ट २०२६ रोजी एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कंपनीच्या खात्याचा बॅलन्स विचारणारा संदेश आला. व्हॉट्सअॅपच्या डीपीवर कंपनीच्या मालकाचे नाव व छायाचित्र असल्याने कर्मचाऱ्याने कोणतीही शंका न घेता खात्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांचे तपशील पाठवून त्यामध्ये पैसे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्याने कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने कंपनीच्या मालकाशी संपर्क साधल्यानंतर बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंटद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात वळविण्यात आली होते, ते खाते संचय पराग चव्हाण (वय २०, रा. डोंबिवली पूर्व, मुंबई) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रमेश कुमार शंकरलालजी पुनीया (वय २४) आणि प्रकाश गोरधनराम पंवार (वय २०) यांच्याशी संपर्क असल्याची माहिती दिली. दोघे सध्या पनवेल येथे राहत असून मूळचे जोधपूर, राजस्थान येथील आहेत.

आरोपींनी संचय चव्हाण याच्याकडून विविध बँकांची एकूण पाच खाती मिळवून त्यांचा वापर सायबर फसवणुकीच्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. फसवणुकीच्या रकमेपैकी काही रक्कम चेक व एटीएमद्वारे काढून घेतल्याचेही समोर आले. तांत्रिक तपासाच्या आधारे रमेश पुनीया व प्रकाश पंवार हे पनवेल परिसरात गॅस दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

या प्रकरणात तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत. गुन्ह्यातील इतर आरोपी तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कंपन्यांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

सायबर गुन्हेगारांकडून कंपनीचे मालक, सीईओ, एमडी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करून कर्मचाऱ्यांना व्यावसायिक व्यवहाराच्या नावाखाली पैसे पाठविण्यास सांगितले जात आहे. तसेच झिप फाईल किंवा एपीके फाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप हॅक करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर ब्लॉक करण्याच्या घटनाही घडत आहेत.

त्यामुळे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाने पैशांची मागणी करणारा संदेश प्राप्त झाल्यास पैसे पाठविण्यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा कंपनीच्या वरिष्ठांशी प्रत्यक्ष अथवा अधिकृत क्रमांकावर संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहावितरणच्या डी.पी. बॉक्सचा करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालात महावितरण दोषी
Next Article अंमली पदार्थविरोधी Reel व Poster स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?