Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महावितरणच्या डी.पी. बॉक्सचा करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालात महावितरण दोषी
पिंपरी चिंचवड

महावितरणच्या डी.पी. बॉक्सचा करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालात महावितरण दोषी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांचा पाठपुरावा; संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी

पिंपरी : पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोड परिसरात मित्र सहकार्य गणेश मंदिराजवळ, कीर्ती हॉस्पिटल शेजारी महावितरण कंपनीच्या डी.पी. बॉक्सचा विजेचा धक्का लागून एका मुक्या गाईचा मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै २०२६ रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधित यंत्रणेवर कारवाईची मागणी केली होती.

तक्रारीची दखल घेत महावितरणकडून हे प्रकरण विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, पिंपरी विभाग यांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांचा अहवाल कुदळे यांना प्राप्त झाला. या अहवालामध्ये सदर घटनेप्रकरणी महावितरण कंपनीला दोषी धरण्यात आल्याचे कुदळे यांनी सांगितले.

घटनेच्या वेळी डी.पी. बॉक्समधून मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रवाह सुरू असल्याने गाईला विजेचा तीव्र धक्का बसला आणि ती काही अंतरावर फेकली जाऊन जागीच मृत्युमुखी पडली, असा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही महावितरणच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालामुळे आपल्या पाठपुराव्याला पहिले यश मिळाले आहे; मात्र केवळ अहवालावर न थांबता या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी सुहास कुदळे यांनी केली आहे.

याप्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “ही लढाई कोणत्याही स्वार्थासाठी नसून मुक्या जीवांच्या आणि आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आहे,” अशी भूमिका कुदळे यांनी व्यक्त केली.

Post Views: 28
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसदस्यांची पूर्वबैठक
Next Article बनावट व्हॉट्सॲप अकाऊंटद्वारे कंपनीची २.२० कोटींची फसवणूक; राजस्थानातील दोघांसह तिघांना अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?