Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसदस्यांची पूर्वबैठक
पिंपरी चिंचवड

महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसदस्यांची पूर्वबैठक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सभागृहाची प्रतिष्ठा, शिस्त आणि नियमबद्ध कामकाजावर भर; सदस्यांना आवश्यक सूचना

पिंपरी-चिंचवड, दि. १ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व सन्माननीय नगरसदस्यांची सत्तारूढ पक्षनेते यांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण पूर्वबैठक पार पडली. या बैठकीत महापालिका सभेतील कामकाज, सभागृहाची प्रतिष्ठा, सदस्यांमधील समन्वय, विषयांवरील चर्चा आणि सभागृहातील शिस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिका सभेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि लोकहिताच्या विषयांवर केंद्रित राहावे, या दृष्टीने सर्व सदस्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

 

सभागृहात प्रत्येक सदस्याने सभागृहाची प्रतिष्ठा व सन्मान कायम राखावा. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी हात वर करून महापौर यांची परवानगी घ्यावी व बोलण्याची संधी मिळाल्यानंतरच आपले मत मांडावे. एकाच वेळी अनेक सदस्यांनी बोलणे, जागेवरून विनापरवानगी बोलणे, इतर सदस्यांच्या भाषणात अडथळा आणणे अथवा सभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणे टाळावे. चर्चेदरम्यान संबंधित विषयापुरतेच बोलावे आणि विषयाशी संबंध नसलेले अथवा अनावश्यक अवांतर वक्तव्य टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या.

महापालिका सभेतील विषयांवर उपसूचना मांडावयाची असल्यास ती शक्यतो सभेच्या किमान एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी, जेणेकरून संबंधित मूळ प्रस्तावाशी तिची सुसंगती, नियमबद्धता आणि प्रशासकीय बाबी तपासून सभागृहापुढे योग्य स्वरूपात मांडता येतील. ऐनवेळी सादर करण्यात येणाऱ्या उपसूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, याचीही सदस्यांनी नोंद घ्यावी, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

तसेच सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, असंसदीय अथवा आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौर यांचे निर्देशांचे उल्लंघन किंवा सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे वर्तन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदस्यांनी आपले मुद्दे वस्तुनिष्ठ, मुद्देसूद आणि सभागृहाच्या नियमांच्या चौकटीत मांडावेत. सभागृहातील शिस्तीचे गंभीर अथवा वारंवार उल्लंघन झाल्यास लागू नियम व तरतुदींनुसार संबंधित सदस्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन विकासकामे व लोकहिताचे विषय प्रभावीपणे मार्गी लागावेत, यासाठी सभागृहातील प्रत्येक सदस्याने संयम, परस्पर सन्मान आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. महापालिका सभेचा वेळ नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि शहराच्या विकासाशी संबंधित निर्णयांसाठी अधिकाधिक परिणामकारकपणे वापरण्याच्या दृष्टीने सर्व सदस्यांनी सहकार्य व समन्वय राखावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘श्री मोरया पुरस्कार २०२५’चे २ सप्टेंबरला ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात वितरण
Next Article महावितरणच्या डी.पी. बॉक्सचा करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अहवालात महावितरण दोषी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?